शिक्षणाधिकाऱ्यांचा दिव्यांग संघटनेतर्फे सत्कार व निवेदन !

शिक्षणाधिकाऱ्यांचा दिव्यांग संघटनेतर्फे सत्कार व निवेदन !

  नाशिक(न्यूज मसाला वृत्तसेवा)::- जि.प. येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांचा सत्कार राज्यसचिव ललित सोनवणे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने करण्यात आला यावेळी  दिव्यांग कर्मचारी यांच्या समस्या व अडीअडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली.

       केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांचा ४% पदोन्नती अनुशेष भरणेबाबत जिल्हा संघटनेची लवकरात लवकर स्वतंत्र बैठक आयोजित करणेबाबत यावेळी निवेदन देण्यात आले.                 यावेळी राज्यसचिव ललित सोनवणे, विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सायखेडा ता.निफाड येथील माजी सरपंच कृष्णा आघाव, जिल्हा सचिव  राजेंद्र खैरनार, जिल्हा सहकोषध्यक्ष विनोद अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप महाले, जिल्हा चिटणीस लक्ष्मण चौधरी, नाशिक तालुकाध्यक्ष सुरेश कापडणीस, निफाड तालुकाध्यक्ष निलेश शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी  दिव्यांग कर्मचारी / अधिकारी यांच्या सर्व समस्या व अडचणी सोडविण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले. जिल्हा सचिव राजेंद्र खैरणार  यांनी  आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा पुस्तकात नोंद करण्यासाठी ११००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दोघांना ताब्यात घेण्यात आले !

आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. नितीन ठाकरे यांनी आज होत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ बाबत दिलेली सविस्तर माहिती व मांडण्यात आलेली महत्त्व पूर्ण व ठळक बाबींसह, शाखा, उपक्रम, नियोजन, आर्थिक स्थिती, भविष्यातील योजना याचा सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडण्यात आलेला लेखाजोखा जसाच्या तसा फक्त न्यूज मसाला वर !