आदर्श समाजनिर्मितीसाठी पत्रकारांनी कटिबद्ध रहावे तालुका पत्रकार संघ कार्यक्रमाप्रसंगी लीना बनसोड यांचे प्रतिपादन ! साप्ताहिक न्यूज मसाला चे प्रतिनिधी करण बिडवे यांचा सन्मान !


आदर्श समाजनिर्मितीसाठी पत्रकारांनी कटिबद्ध रहावे तालुका पत्रकार संघ कार्यक्रमाप्रसंगी लीना बनसोड यांचे प्रतिपादन !

साप्ताहिक न्यूज मसाला चे प्रतिनिधी करण बिडवे यांचा सन्मान ! 


     देवळाली कॅम्प :- पत्रकारिता क्षेत्रात निष्पक्षपणे काम करण्याबरोबर आदर्श समाजनिर्मितीसाठी पत्रकारांनी कटिबद्ध राहणे आवश्यक असतांना सामाजिक जबाबदारीचे भान राखत तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा घटकांचा नाशिक तालुका मराठी पत्रकार संघ करीत असलेल्या गौरव लाखमोलाचा असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी केले. 
   अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,(मुंबई) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यगौरव पुरस्कार येथील डॉ गुजर सुभाष हायस्कूलच्या सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप, तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन, अभिनेते डॉ. चैतन्य बागुल, दिग्दर्शकी विनोद लवेकर,अभिनेत्री रसिका वाघाराकर,कृष्णा मरकड,शंकर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नवीन गुरुनानी, सेक्रेटरी रतन चावला,संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, गणेश गायधनी,नाशिकरोड बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड.सुदाम गायकवाड आदी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयंत महाजन यांनी पत्रकार दिनाचा आढावा घेताना दैनिकांची सद्यस्थिती,पत्रकारितेचे बदलते स्वरूप, आव्हाने,पत्रकारांवरील हल्ले, संघर्ष याविषयी भाष्य केले. गेली दोन दशके समाजाच्या विविध क्षेत्रातील गुणवंतांची निवड करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचे प्रशंसनीय कार्य तालुका पत्रकार संघ करत असल्याचे नमुद केले. मनोगतातून रतन चावला यांनी पत्रकार संघाचे उपक्रम समाजाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. प्रास्तविक अध्यक्ष सुधाकर गोडसे, सुत्रसंचलन रवींद्र मालुंजकर तर आभार अरुण बिडवे यांनी मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साप्ताहिक न्यूज मसाला चे प्रतिनिधी करण बिडवे, उमेश परिपूर्ण, अशोक निसाळ , दिलीप सूर्यवंशी , दत्ता जाधव , विलास भालेराव , महेश गायकवाड , अशोक गवळी , प्रशांत निरंतर , श्रीधर गायधनी , जिजा दवंडे , राजेंद्र सूर्यवंशी , निलेश अलई , सुशील भागवत, गुलाब ताकाटे, प्रवीण गोसावी, कल्पेश लचके ,जितेंद्र नरवडे, भैयासाहेब कटारे , निलेश हासे, सर्पमित्र विक्रम कडाळे प्रा. संगीता पवार, प्रशांत दाते ,सुनील भिसे , कैलास भोर ,संजय कल्याणी शिवम तागड , अमोल गायधनी , संजय पेखळे, तन्वी लखवानी , शिवा महाराज आडके , बबनराव कांगणे, सुमित्रा पाटोळे, जगदंबा माता ट्रस्ट,  शंकर एज्युकेशन सोसायटी, आदर्श सैनिक फाऊंडेशन, जनकल्याणी फाउंडेशन आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ आदींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यशस्वीतेसाठी वाल्मिक शिरसाठ, प्रमोद रहाणे, साप्ताहिक न्यूज मसाला चे संपादक तथा मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सुनील पवार, अरुण तुपे, दीपक कणसे, प्रकाश उखाडे, प्रवीण आडके, प्रशांत धिवंदे, सुभाष कांडेकर,  संजय निकम, वसंत कहांडळ, नंदू शेळके, भास्कर सोनवणे आदी प्रयत्नशील होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे