"बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा" उपकरणाला पारितोषिक !

 "बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा" उपकरणाला पारितोषिक !
तालुका विज्ञान प्रदर्शनात देवरे विद्यालयाच्या भावीन बोरसे यास तृतीय क्रमांक प्राप्त !!

       खोंडामळी (प्रतिनिधी)::- श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथील इ.१०वी चा विद्यार्थी भाविन किशोर बोरसे याने सादर केलेल्या 'बाळाच्या आरोग्यासाठी माझी यंत्रणा' या उपकरणाने शिक्षण विभाग पंचायत समिती नंदुरबार व  नंदुरबार तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, नंदुरबार यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४३ व्या नंदुरबार तालुका विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवला. सदर विज्ञान प्रदर्शन माध्यमिक विद्यालय सेजवा ता.जि.नंदुरबार येथे संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) सतिष  चौधरी यांच्या हस्ते भावीन बोरसे यास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरांकित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी डाॅ.युनूस पठाण उपशिक्षणाधिकारी ( माध्य.), निलेश पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नंदुरबार, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव, पुष्पेंद्र रघुवंशी, नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे व प्रमुख मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी आर.ए.देवरे, सौ.शैलजा देवरे, एस.ए.देवरे, एन.ए.देवरे, मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी अभिनंदन केले.

       भाविन बोरसे यास विद्यालयाचे शिक्षक एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर वृंद, विखरण, नाशिंदा, खापरखेडा, बोराळा गावातील पालक वर्गाकडून भाविनचे अभिनंदन करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !

भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती उत्सवाचे ४ व ५ सप्टेंबर रोजी आयोजन...!

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,