प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच ! "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !!

प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी "बांबू" लागतातच !  "बांबू" लागू नयेत यासाठी काय गरजेचे आहे ते बघूया २६ जानेवारीपासून !!

         नाशिक ( प्रतिनिधी ) - प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा  ‘बांबू’ चित्रपट लवकरच दि.२६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


    क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित, अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेनं’ हे धमाल गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले असून तरूणाईला भुरळ घालणारे हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. या गाण्याचे बोल सचिन पाठक यांचे असून समीर सप्तीसकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, ‘’ मुळात तरूणाईला हा चित्रपट त्यांच्या आयुष्याच्या जवळपासचा वाटणारा आहे. तरुणाईला समोर ठेवून जरी या चित्रपटाची निर्मिती केली असली तरी तरूणांनी हा चित्रपट त्यांच्या पालकांसोबत पाहावा, असा आहे. २६ जानेवारीला ‘बांबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा एक धमाल एंटरटेनर आहे.’’
    निर्माती तेजस्विनी पंडित म्हणाली, ‘’या टीमसोबत काम करताना खूप धमाल आली. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. प्रत्येकानेच आपली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम आहे. मला खात्री आहे, प्रेक्षकांना ‘बांबू’ नक्कीच आवडेल.’’ निर्माते संतोष खेर म्हणाले, ‘’ मुळात याची कथा आम्हाला विशेष भावली. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी बांबू लागतातच. मग ते प्रेमात असो वा इतर कशाही बाबतीत. अशीच प्रेमात ‘बांबू’ लागल्याची गोष्ट आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा ‘बांबू’ आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !