बोधिसत्व फाऊंडेशन आणि सलोखा समूह आयोजित सामाजिक सलोखा चित्र प्रदर्शन ही काळाची गरज- प्रमोद मुजुमदार
बोधिसत्व फाऊंडेशन आणि सलोखा समूह आयोजित सामाजिक सलोखा चित्र प्रदर्शन ही काळाची गरज- प्रमोद मुजुमदार
यवतमाळ::- बोधिसत्व फाउंडेशन आणि सलोखा समूह गटाच्या वतीने यवतमाळ येथील सावित्री ज्योतिराव समाजशास्त्र महाविद्यालयात, सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. चौदा शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
सामाजिक सलोखा या विषयावरील चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रमोद मुजुमदार आणि निशा साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुजुमदार यांनी, अखंडप्राय आपला भारत देश जागतिक महासत्तेच्या दिशेने सरसावतो आहे तेव्हा सामाजिक सलोखा बाळगणे ही काळाची गरज आहे, आपली एकसंधता हीच खरी शक्ती आहे असे मत उद्घाटनप्रसंगी मनोगतात व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी बोधिसत्व फाउंडेशनच्या अमृता खंडेराव आणि सौ. प्रज्ञा तांबेकर यांनी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये समाजातील सर्व घटकांबद्दल जिव्हाळा आणि आस्था निर्माण व्हावी हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश शिर्के प्राध्यापक घनश्याम दरणे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रदर्शनासाठी प्रा. घनश्याम दरणे, शर्मिष्ठा खेर, सत्यशील जाधव आणि निशा साळगावकर यांनी प्रोत्साहन दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा