“हरवलेले राज्य-हरवलेल्या वारशाच्या क्षेत्रात जा” या थीमसह वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये `युन्योया’ महोत्सवाला शानदार सुरुवात !
“हरवलेले राज्य-हरवलेल्या वारशाच्या क्षेत्रात जा” या थीमसह वसंतदादा पाटील प्रतिष्ठानमध्ये `युन्योया’ महोत्सवाला शानदार सुरुवात !
मुंबई::- आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आकर्षण असलेल्या `युन्योया’ महोत्सवाला शानदार सुरूवात झाली आहे. वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजन करण्यात आले असून यात सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या विभागात विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
“हरवलेले राज्य-हरवलेल्या वारशाच्या क्षेत्रात जा” या थीमसाठी संपूर्ण कचऱ्यापासून बनलेल्या साम्राज्यासारखी भव्य कृती ही या महोत्सवाचे विशेष आकर्षण होती. वृत्तपत्रे, फ्रीज बॉक्स आदींपासून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. उद्घाटनपर कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक नृत्य सादर केले.

या महोत्सवाबाबत बोलताना संस्थेचे सरचिटणीस अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रात संधी मिळविण्यासाठी तसेच करिअर करण्याच्या दृष्टीने पर्वणी ठरणार आहे. हा महोत्सव त्यानिमित्ताने संकल्पित करण्यात आला असून त्याचा उपयोग निश्चितपणे सकारात्मक आणि भरीव कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करणारा आहे.
आंतरमहाविद्यालयीन संगीत, नृत्य, फॅशन, क्रीडा, प्रश्नमंजुषा, सामान्य ज्ञान, व्याख्याने असे या महोत्सवाचे स्वरुप आहे. त्यासाठी अनेक पारितोषिकेदेखील दिली जाणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांना यासाठी निमंत्रित केले आहे. सोहम शिंदे, भूमिका सैनी, स्मित पवार, रोहन काटकर तसेच आर्यन गांगुर्डे हे विद्यार्थी संचालक मंडळी महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा