युवा रेडक्रॉस हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम : डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी

युवा रेडक्रॉस हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम : डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी 

    नाशिक : " छत्रपती शिवरायांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ आणि इतिहासातील ध्रुवतारा स्वामी विवेकानंद यांचा आज जन्मदिन. या दुर्मिळ योगावर आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सारख्या मानवतावादी संघटनेच्या युथ रेडक्रॉस या उपयुक्त उपक्रमाला नाशिकचे युवक आपलेसे करत आहेत ही नाशिक रेडक्रॉस साठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या युथ रेडक्रॉस च्या वाटचालीत आम्ही खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन नाशिक रेडक्रॉस चे चेअरमन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले.

मविप्र चे आर्किटेक्चर कॉलेज आणि नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या युथ रेडक्रॉस शाखांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर पी. एम. भगत होते तर सुप्रसिद्ध वास्तुरचना तज्ज्ञ प्रसन्न भोरे, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ.विजय वाघ, आर्किटेक्ट महाविद्यालयाचे प्रा.आशीष खेमनार , प्रा. मेघा बुटे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.  कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमापूजनाने झाली. प्रास्ताविकात रेडक्रॉस सचिव डॉ.सुनील औंधकर यांनी रेडक्रॉस चा इतिहास, मूलतत्वे आणि युथ रेडक्रॉस नियमावली बद्दल सविस्तर माहिती दिली.यानंतर उपस्थित सर्व युवकांनी युथ रेडक्रॉस ची प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडक्रॉस समन्वयक डॉ. प्रतिभा औंधकर यांनी केले तर डॉ.चंद्रशेखर नामपूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयांचे युथ रेडक्रॉस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत गोसावी , मंगल कस्तुरे आदी प्रयत्नशील होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !