‘आयबीटी’च्या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या ‘ब्रायडल लुक’ ची झळाळी ! ‘आयबीटी’ला सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती जाहीर !!

‘आयबीटी’च्या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या ‘ब्रायडल लुक’ ची झळाळी !
  ‘आयबीटी’ला सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती जाहीर !!

     नाशिक : दुबईस्थित मॉडेलद्वारा सादर करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ आणि कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक मुळे आयबीटीला सिड्यास्को संस्थेची अधिस्वीकृती जाहीर करण्यात आली. सुमारे तीनशे सौंदर्यवतींचा उत्स्फूर्त सहभाग आणि उपस्थितांना लाभलेले सौंदर्यशास्त्रातील करियर मार्गदर्शन हा चतु:ष्कोन आयबीटीद्वारा नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करून गेला.

         आयबीटी संस्थेच्या वतीने हॉटेल सेलेब्रिटा येथे सदर सेमिनाररुपी कार्याक्रमाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी दुबईस्थित मॉडेल क्रिस्टीना हिने आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचा ‘ब्रायडल लुक’ सादर केला. उपस्थित  सौंदर्यवतींच्या अपेक्षेला साद घालत केलेल्या या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली. याव्यतिरिक्त दुसऱ्या एका मॉडेलने प्रथमच कोड असलेल्या स्कीनवरील नववारी लुक सादर करून सौंदर्यवतींची वाहवा मिळवली. या दोन्ही सादरीकरणातील मॉडेल्सचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मेकअप आर्टिस्ट भाग्यश्री धर्माधिकारी यांनी केलेला मेकअप देखील कौतुकाचा विषय ठरला. दोन्ही मेकअप लाईव्ह पद्धतीने दाखवण्यात आले. याप्रसंगी सिड्यास्को संस्थेच्या प्रमुख सीमा गोपुचकर, आयबीटी नाशिकच्या संचालिका भाग्यश्री धर्माधिकारी, संचालक गौरव धर्माधिकारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाग्यश्री धर्माधिकारी यांनी सौंदर्यशास्त्र उद्योग क्षेत्रातील करियरच्या संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक आणि संगमनेर येथील आयटीआयचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 आयबीटीला सिड्यास्कोची अधिस्वीकृती !
         दरम्यान, या सेमिनार प्रसंगी आयबीटी संस्थेला सिड्यास्कोची अधिस्वीकृती मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी सिड्यास्को संस्थेच्या प्रमुख सीमा गोपुचकर यांच्या हस्ते धर्माधिकारी दाम्पत्याने त्याचा स्वीकार केला. अशा प्रकारचा बहुमान उत्तर महाराष्ट्रात केवळ आयबीटी संस्थेला मिळाल्याचे गोपुचकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. मेकअप आणि स्कीन कोर्सेसच्या माध्यमातून करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ७७७०० ७०१०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !