पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्यावतीने स्वेटर वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्यावतीने स्वेटर वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

          सांजेगांव(ता.इगतपुरी):- पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था नासिक आणि जिल्हा परिषद नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा सांजेगांव येथील २४० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.

     दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे आणि सरस्वती पूजन तसेच दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष सुभाष सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.

        याप्रसंगी निवृत्ती जाधव यांनी बोलताना पत्रकार फक्त बातमीच घेण्यासाठी येतात असे नाही तर ते समाजाचा आरसा बनून येतात, राजकारणी व प्रशासनाकडून प्रश्नांची सोडवणूक करून घेतात, यापलीकडे जाऊन या संस्थेने आज विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करून जांभेकरांच्या स्मृतींना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले यातून पत्रकारांची समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होताना दिसते यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

      विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घेत दैनंदिन अभ्यासक्रम व वेळच्या वेळी गृहपाठ कसा पूर्ण करावा याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते यांनी मार्गदर्शन केले.

       संस्थेच्यावतीने थंडीच्या दिवसात स्वेटर वाटप करून मायेची उब, आरोग्याची तपासणी व विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी  यासाठी २५०० रुपयांची पुस्तकं शाळेच्या वाचनालयासाठी देण्यात आली.
 याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, डॉ. विजय माळी मुख्याध्यापक सुनील ब्राह्मणकर, संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष सुभाष सबनीस, खजिनदार नरेंद्र सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते सुहास भणगे, कार्यकारिणी सदस्य पुंजाजी मालुंजकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब गोवर्धने, उपाध्यक्ष सुनील गोवर्धने, पत्रकार सुनील पवार, अरुण तुपे, अरूण बिडवे, संतोष भावसार, शिक्षिका वसुंधरा ज्ञानोबा इगवे, नसरीन उस्मान पठाण, रत्नमाला भीमराव रौंदळ, ज्योती भामरे, शिक्षक छगन सुर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल बाविस्कर यांनी केले.
मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था ही नेहमीच अशा प्रकारचे समाजाभिमुख कामे करीत आहे. अशी कामे करतांना समाजातील विविध क्षेत्रातील घटकांचा विचार करुन गरजेनुसार योग्य उपक्रम हाती घेणे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष सबनीस यांनी याप्रसंगी केले.

टिप्पण्या

  1. पत्रकार नरेंद्र पाटील यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. अभिनंदन & धन्यवाद!👌💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !