सहशालेय उपक्रमांची माहिती असलेल्या "यशोगाथा" पुस्तकाचे आज प्रकाशन !

सहशालेय उपक्रमांची माहिती असलेल्या "यशोगाथा" पुस्तकाचे आज प्रकाशन !

      नाशिक(२९)::- सुरगाणा तालुक्यातील वांगणपाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संजय बागुल यांच्या पुणे येथील, वैशाली प्रकाशन प्रकाशित 'यशोगाथा' या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सहशालेय उपक्रमांची माहिती देणाऱ्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन आज (दि.२९जानेवारी रोजी) दुपारी १२ वाजता होणार आहे.

     सावानाच्या ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, उपजिल्हाधिकारी हिरामण झिरवाळ, शिक्षणाधिकारी (प्राथ.) भगवान फुलारी, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष प्राचार्य अशोक बागुल, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
     सुरगाणा गटविकास अधिकारी दीपक पाटील, कळवण गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, सुरगाणा गटशिक्षणाधिकारी लता भरसट, कळवण गटशिक्षणाधिकारी, एस. जी. बच्छाव, कळवण पंचायत समिती सभापती जी. पी. साबळे, सुरगाणा पंचायत समिती सभापती मनीषा महाले, मनखेड शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप नाईकवाडे, कवी देवदत्त चौधरी, हस्ते केंद्रप्रमुख शारदा सरोदे, साहित्यिक तुकाराम चौधरी, प्रकाशक विलास पोतदार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !