सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व संवर्गांच्या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध !
सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व संवर्गांच्या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध !
सलग तिसऱ्या वर्षी १ जानेवारी रोजी ५२ संवर्गांच्या ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध !!
नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या या १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. सलग तिसऱ्या वर्षी सेवा ज्येष्ठता याद्या या १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सेवा ज्येष्ठतेसंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या ज्येष्ठतेसंबधी सूची हि प्रत्येक वर्षी ३१ डिसेंबर रोजी तयार करण्यात येऊन १ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने यावर्षी देखील गट क व गट ड संवर्गातील सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ५२ संवर्गाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या ह्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जिल्हा परिषद अधिनस्त कार्यरत असलेल्या गट क व ड मधील १६००० कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या ह्या प्रसिद्ध झाल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून सर्व विभागांशी समन्वय साधत सेवा ज्येष्ठता याद्या या तयार करण्यात येतात. गेल्या तीन वर्षांपासून सेवा ज्येष्ठता याद्या ह्या १ जानेवारी रोजी नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे लाभ देताना सेवा ज्येष्ठता यादीद्वारे देण्यात येतात त्यामुळे सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत असल्यास कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे लाभ देता येतात. या ज्येष्ठता यादी बाबत कर्मचाऱ्यांना आक्षेप असल्यास एक महिन्याच्या आत विहित नमुन्यातील अर्जाद्वारे आपला आक्षेप नोंदवण्याचे आवाहन देखली उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी केले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रणजित पगारे, गणेश बगड, वरिष्ठ सहायक भास्कर कुंवर, सरला सोनार, हर्षदा खैरनार यांच्यासह सर्व विभागातील सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, आस्थापना लिपिक यांनी मेहनत घेतली.
***********************************
"मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार सर्व संवर्गाच्या सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे लाभ देताना सेवा ज्येष्ठता यादी द्वारे देण्यात येतात त्यामुळे जिल्हा परिषद अधिनस्त १६००० कर्मचाऱ्यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या ह्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, यादीबाबत आक्षेप असल्यास कर्मचाऱ्यांना एक महिन्यात नोंदवावा ३१ जानेवारी रोजी अंतिम सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात येतील."
-आनंदराव पिंगळे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
सामान्य प्रशासन विभाग, जि. प. नाशिक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा