जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा- मुख्य कार्यकारी अधिकारी !
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा- मुख्य कार्यकारी अधिकारी !
नाशिक : देशातील प्रतिभावंत आणि हुशार विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण देण्यासाठी १९८६ सालच्या शैक्षणिक धोरणामध्ये नवोदय विद्यालय स्थापनेची तरतूद करण्यात आली, या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पात्रता परीक्षेची आयोजन हे दरवर्षी करण्यात येते. यावर्षी देखील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालयासाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेसाठी जास्तीत जास्त संख्येने फॉर्म भरावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी ३१ जानेवारी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत याबत माहिती पोहचवण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहेत. जे विद्यार्थी, विद्यार्थिनी २०२२-२३ या शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे, ज्यांची जन्मतारीख ०१ मे २०११ ते ३० एप्रिल २०१३ च्या दरम्यान आहेत व ते नियमित इयत्ता तिसरी आणि चौथी इयत्ता उत्तीर्ण झालेले आहेत, तसेच नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत, असे विद्यार्थी, विद्यार्थिनी या या परिक्षेसाठी आवेदनपत्र भरण्यासाठी पात्र आहेत.
ऑनलाइन आवेदनपत्र विनामुल्य भरण्यासंबंधित संपूर्ण माहिती नवोदय विद्यालय समिती नवी दिल्लीच्या www.navodaya.gov.in, जवाहर नवोदय विद्यालय समिती क्षेत्रिय कार्यालय, पुणे च्या https://navodaya.gov.in/nvs/ro/Pune/en/home/index.html व जवाहर नवोदय विद्यालय खेडगाव विद्यालयाच्या www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Nashik/en/home या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
************************************
नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षेचा अर्ज हा भरावा, जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनी पात्रता परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे.
- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नाशिक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा