पिंपळगाव येथे महायज्ञ व संस्कार महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ ! सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन !!

पिंपळगाव येथे महायज्ञ व संस्कार महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ ! सहभागी होण्याचे आयोजकांचे आवाहन !!

       पिंपळगाव ( प्रतिनिधी ):- नवनर्षाच्या प्रारंभी आज दि. १ जानेवारीपासून पिंपळगाव बसवंत येथे २४ कुंडीय गायत्री महायज्ञ व संस्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.१ ) दुपारी २ ते ५ या वेळेत स्वामी समर्थ केंद्रापासून ते उमियाधाम या कार्यस्थळा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली व उत्साहात प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन झाले. विज्ञान व आध्यात्मिक शक्ती यांचा समन्वय घडविणारे सर्व कार्यक्रम आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ उमिया धाम येथे होतील. 

    उद्या पासून दि.२ ते ४ च्या दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७.३० या वेळेमध्ये सामूहिक जप, ध्यान व व्यायाम होतील. ९ ते १२ या वेळेत गायत्री महायज्ञ केला जाईल. उद्या दि.२ रोजी सकाळी ९ ते १२ देवपूजन होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ संगीतमय प्रवचन होईल.

दि.३ रोजी दुपारी ५ ते ७ या वेळेत विराट गायत्री दीप महायज्ञ होईल. दि.४ रोजी सकाळी ९ ते १२ दीक्षा संस्कार, पूर्णाहुती व महाप्रसादाचे वितरण होणार आहे. सर्व बंधुभगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजक समस्त कच्छी गुजराती परिवार व गायत्री महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९३७२०५२८२२ व ९८२३१३७०७५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !