अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारिणी जाहीर !

अखिल भारतीय मराठा महासंघाची नाशिक कार्यकारिणी जाहीर !
 
   नासिक (प्रतिनिधी)::- अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत पवार यांनी नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. नाशिक शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात नाशिक शहर युवक सरचिटणीस पदी उमेश अहिरे, नाशिक शहर युवक कार्याध्यक्ष पदी आशिष पुरी, नाशिक ग्रामीण मध्ये देवळा तालुका युवक अध्यक्ष पदी रविन्द्र पवार व बागलाण तालुका युवक अध्यक्ष पदी संदीप अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली.

सर्व पदाधिकाऱ्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत पदभार सोपविण्यात आला.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व केंद्रीय कार्यकारिणी व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांचे सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !