६ जानेवारी रोजी होणार सह आयुक्त लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' चे प्रकाशन !

६ जानेवारी रोजी होणार सह आयुक्त लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' चे प्रकाशन !

       मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भरारी प्रकाशन आणि कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वाती काळे (सहआयुक्त, वस्तू आणि सेवा कर विभाग, मुंबई) लिखित 'गोष्टीपलीकडचे महाभारत' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि 'विश्वातील १० आदर्श शिक्षिका' या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता मिनी थिएटर, (रवींद्र नाट्यमंदिर), तिसरा मजला, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. 'गोष्टीपलीकडचे महाभारत' या स्वाती काळे लिखित पुस्तकाचे प्रकाशन शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तसेच मुंबई शहर व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रसिद्ध लेखक व साहित्यिक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, धर्मशास्त्र, पुराभिलेख विद्या, भारतीय स्त्रीवाद व सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासक डॉ. प्राची अमोघ मोघे, लोकसाहित्य व लोककला अभ्यासक प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर व ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि कादंबरीकार अशोक समेळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

          यावेळी श्री मुद्रा कलानिकेतनच्या डॉ.  वृषाली दाबके आणि सहकलाकार कथ्थक नृत्य सादर करतील. पुस्तक प्रकाशनानंतर ख्यातनाम पंडवानी गायिका समप्रिया पूजा निषाद आणि सहकारी पंडवानी कथा गायनाचा सुंदर कार्यक्रम सादर करणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक करणार असून, प्रसिद्ध अभिनेता दिग्दर्शक मंगेश सातपुते  'गोष्टीपलीकडचे महाभारत' या पुस्तकातील एका उताराचे अभिवाचन करणार आहे.  तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन भरारी प्रकाशनच्या संचालिका लता गुठे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे