श्री बाबा रामदेवजींचा जम्मा जागरण ५ डिसेंबरला ! नाशिकच्या रामदेवजी भक्त परिवाराने केले आयोजन !
श्री बाबा रामदेवजींचा जम्मा जागरण ५ डिसेंबरला !
नाशिकच्या रामदेवजी भक्त परिवाराने केले आयोजन !
नाशिक::- येथील रामदेवजी भक्त परिवारातर्फे ‘ श्री बाबा रामदेवजी यांचा विशाल जम्मा जागरण’ कार्यक्रम सोमवार ५ डिसेंबर २२ रोजी दुपारी १ वाजेपासून ते रात्रीपर्यंत धनदाई लॉन्स येथे आयोजित केला आहे. हैदराबाद येथील संगीतकार व कथाकार सुशिल गोपल बजाज हे हा कार्यक्रम सादर करणार आहे.
या कार्यक्रमात दुपार पासून होम हवन, अखंडज्योत, भजन, जन्म वृत्तांत, कथा ब्यावला, महाप्रसादी व महाआरती होणार आहे.
तर या कार्यक्रमाचे आयोजन समिती तर्फे स्वप्नील जैन, रुपाली गौड, तृप्ती जैन, संजय लोढा, प्रा. सीए. लोकेश पारख, नंदकिशोर हरकुट, सचिन कोठारी हे विशेष परिश्रम घेत आहे.
या जम्मा जागरण सोहळ्यात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रामदेवजी भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा