जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद !
जिल्हा परिषद "ग्रामविकासाची शाळा" या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद !
नाशिक (प्रतिनिधी)::- जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याची संकल्पना नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागात मुख्य औषध निर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत असणारे जी.पी. खैरनार यांनी तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती पत्राद्वारे केली होती. नाशिक जिल्हा परिषदेने या वैविध्यपूर्ण उपक्रमास नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नियमित विषय घेऊन अभिनंदनासह मान्यता दिली होती. नाशिक जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपादकीय जबाबदारी घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त उपलब्ध करुन दिले होते. जी. पी.खैरनार यांनी सदर इतिवृत्त संकलित करुन जिल्हा परिषद नाशिक "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन पुस्तकाची बांधणी केली होती. प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन नाशिक जिल्हा परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेच्या दिनांक २८ फेब्रुवारी, २०२२ च्या सर्वसाधारण सभेत केले होते. नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पोपट पिंगळे यांनी संपादित केलेल्या व जी. पी.खैरनार यांनी संकलित केलेल्या या पुस्तकाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री, प्रधान सचिव, ग्रामविकास सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सस्नेह पाठविल्या होत्या. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल आनंदराव पिंगळे व जी. पी. खैरनार यांचे अभिनंदन करुन विशेष सत्कार केला होता.
महाराष्ट्र राज्याच्या जनतेस त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेतील जिल्हा परिषद या सर्वोच्च संस्थेच्या सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक सभांचे इतिवृत्त पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणारी महाराष्ट्र राज्यातील पहिली आणि एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे. या प्रकाशन उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या या विक्रमाची नोंद द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस राष्ट्रीय विक्रम म्हणून करण्यात आली आहे. भारत हा एक लोकशाही देश असून ग्रामीण भागातील जनतेत स्थानिक विकास साधण्यासाठी तथा जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यासाठी देशपातळीवर व राज्य पातळीवर ग्रामविकास विभाग स्वतंत्रपणे निर्माण केला गेला आहे. महाराष्ट्र राज्यातील त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था निर्माण करून जनतेस मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न ग्रामविकास विभागामार्फत केला जातो.
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याप्रमाणे त्रिस्तरीय प्रणाली कार्यान्वित आहे. पंचायत राज प्रणाली मधील जिल्हा परिषद ही ग्रामीण भागात शासनाच्या बहुविध योजनांच्या अंमलबजाव करणारी व प्रत्यक्ष योजना राबविणारी सर्वोच्च संस्था आहे. नाशिक जिल्हा परिषदेने त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील लोकनियुक्त लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या माध्यमातून होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतीवृत्त "ग्राम विकासाची शाळा " या नावाने पुस्तक रुपात प्रसिद्ध केले आहे.
या पुस्तकात २१ मार्च २०१२ पासून २० मार्च २०१७ या कालावधीत झालेल्या सभांचे १००१ ठराव नमूद आहेत. ग्रामीण भागातून नेतृत्व करणाऱ्या नवख्या युवकांना या पुस्तकातून ग्राम विकासाचा गाडा कशाप्रकारे चालतो, याचा बोध होणार आहे.
ग्रामीण जनतेसाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या योजना, प्रत्यक्ष लाभार्थी, व्यक्तीस लाभ देण्याची पद्धती, विविध विकास योजनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त पुस्तक रूपाने प्रसिद्ध करणारी जिल्हा परिषद नाशिक ही राज्यातील पहिली एकमेव जिल्हा परिषद ठरली आहे.
महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना मार्गदर्शक ठरलेल्या या प्रकाशन उपक्रमाची दखल घेऊन त्यांच्या या कार्याच्या विक्रमाची नोंद दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय विक्रम व एशियन बुक ऑफ रेकॉर्डस् नॅशनल रेकॉर्ड्स म्हणून करण्यात आली आहे.
*******************************
नाशिक जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे पंचवार्षिक इतिवृत्त जिल्हा परिषद, नाशिक "ग्रामविकासाची शाळा" हे शीर्षक घेऊन प्रसिद्ध केले. या उपक्रमाची नोंद दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय विक्रम व एशियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये सुद्धा राष्ट्रीय विक्रम म्हणून घेऊन नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव केला आहे. हा सन्मान तात्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व समस्त जिल्हा परिषदेच्या कर्मचारी यांचा हा सन्मान आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या या विक्रमाने नाव लौकिकात भर पडली आहे.
आनंदराव पोपट पिंगळे, संपादक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, नाशिक.
***********************************
नाशिक जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्याची संधी नाशिक जिल्हा परिषदेने दिली त्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे विशेष आभार व्यक्त करतो. तसेच पुस्तक बांधणी कामी वैशाली प्रकाशन पुणे, टाईप सेटिंग साठी किरण गोरले, मुद्रनासाठी देवगिरी ऑफसेट, नाशिक यांचे अनमोल सहकार्य लाभले त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो.
नाशिक जिल्हा परिषदेच्या अभिनव विक्रमाची नोंद दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये राष्ट्रीय विक्रम व एशियन बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणुन नोंद घेतल्याबद्दल या संस्थांचे विशेष आभार व्यक्त करतो.
या पुस्तकांतून भविष्यातील ग्रामीण तरुण पिढीस शासकीय मार्गदर्शक म्हणुन हे पुस्तक ठरेल यात शंका नाही.
जी. पी.खैरनार, संकलक तथा मुख्य औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नाशिक.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा