संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ !
संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी (२६ नोव्हेंबर, २०२३) संविधान दिन साजरा करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन आणि प्रश्नमंजुषा याकरिता काल पोर्टल्सचा केला प्रारंभ !
भारतीय राज्यघटना स्वीकारली गेल्याच्या दिवसाची आठवण आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांनी दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमातले सक्रिय सहभागी म्हणून संसदीय कामकाज मंत्रालयाने दोन डिजिटल पोर्टल्स सुधारित आणि अद्ययावत केले आहेत. खास संविधान दिन, २०२२ साठी केलेल्या या पोर्टल्सपैकी एक राज्यघटनेची उद्देशिका इंग्रजी आणि आणि राज्यघटनेच्या ८ व्या अनुसूचीअंतर्गत नमूद केलेल्या २२ इतर भाषांमध्ये वाचण्यासाठी (https://readpreamble.nic.in/ ) असून दुसरे "भारतीय संविधानावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा" (https://constitutionquiz.nic.in/ ) यासाठी आहे.
संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला (२५.११.२०२२) संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी २२ अधिकृत भाषांमध्ये आणि इंग्रजीमध्ये संविधानाची उद्देशिका वाचण्यासाठी (https://readpreamble.nic.in/) आणि "भारतीय संविधानावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा" (https://constitutionquiz.nic.in/ ) या पोर्टल्सचा दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रारंभ केला. सर्व नागरिकांनी २३ भाषांपैकी आपल्याला सुलभ वाटणाऱ्या भाषेत संविधानाची उद्देशिका वाचावी, असे प्रल्हाद जोशी यांनी यावेळी सांगितले. भारत सरकारची मंत्रालये/विभाग यासह राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारे, शाळा/महाविद्यालये/विद्यापीठे/संस्था इ. पोर्टलला (https://readpreamble.nic.in/ ) भेट देऊ शकतात आणि उद्देशिकेचे वाचन करून स्व-स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र मिळवू शकतात.
हे सार्वजनिक अभियान होण्यासाठी आणि जनभागीदारी सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाने भारतीय राज्यघटनेवरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा (https://constitutionquiz.nic.in/ ) हे पोर्टल अद्ययावत केले आहे. ही एक ऑनलाइन प्रश्नमंजुषा असून त्यात भारतीय राज्यघटना आणि लोकशाही याविषयी अतिशय साधे आणि मूलभूत प्रश्न आहेत. यात कोणीही भाग घेऊ शकतो आणि सहभाग प्रमाणपत्र मिळवू शकतो. ही प्रश्नमंजुषा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल जेणेकरून जास्तीत जास्त लोक सहभागी होऊ शकतील. या उत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे आणि #SamvidhanDiwas वापरून आणि फेसबुकवर @MOPAIndia , ट्विटरवर @mpa_india टॅग करून त्यांची प्रमाणपत्रे शेअर करावीत, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे.
************************************
न्यूज मसाला संपादक नरेंद्र पाटील यांनी संविधान दिन साजरा करण्याच्या पूर्वसंध्येला भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे आॅनलाईन वाचन करीत प्रश्नमंजुषेत सहभाग नोंदविला व प्रमाणपत्र प्राप्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा