सदाचारी बनो जीवन में आगे बढो !

सदाचारी बनो जीवन में आगे बढो !

   नासिक::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम व्यक्तिमत्व व बदलत असलेली शिक्षण पद्धती यांचे महत्व सांगण्यासाठी  दि. २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.

       आजच्या समाजात शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शिक्षणाचे बरेच उपयोग आहेत परंतु त्यास एक नवीन दिशा देणे आवश्यक आहे. शिक्षण आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. आपल्या जीवनात शिक्षणाची ही साधने वापरुन आपण काहीही चांगले साध्य करू शकतो. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सर्वांसाठी, सामाजिक आणि वैयक्तिकरित्या खूप महत्वाचा काळ आहे, यामुळेच आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व  आहे.आजच्या आधुनिक 
आजच्या काळात शिक्षणाची पातळी वाढवण्यासाठी अनेक पद्धती अवलंबल्या जातात हे सांगताना त्यांनी गुरुकुल पद्धतीचे शिक्षण व त्याचे फायदे देखील विविध उदाहरणांतून विद्यार्थ्यांसमोर मांडले; तसेच करोना महामारी पूर्वीं चे शिक्षण करोना काळातले शिक्षण व आता परत प्रत्यक्ष घेत असलेले शिक्षण यातील फरक  व जुन्या नव्याची योग्य सांगड घालून आपण आपले जीवन यशस्वी व आनंदी कसे घडवू शकतो याची जणू गुरुकिल्लीच त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य वयात दिली.
       विद्यार्थ्यांनी या प्रश्नोत्तर सत्रात उत्तम प्रतिसाद दिला आणि आदर्श व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न नक्कीच करू असे सांगितले.
     शाळेचा हेड बॉय जय तासकर याने बॉईज टाऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी केलेले प्रयत्न एक अनुभव म्हणून सगळ्यांना सांगितला. कुमारी युतिका छाजेड हिने आभार प्रदर्शन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !