आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार
आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशी
कोणताही संबंध नाही - दातार
नाशिक ( प्रतिनिधी ) - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील तुपादेवी फाट्याजवळ असलेल्या आधारतीर्थ आश्रमात एका बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. काल ( दि.२३)भ विविध वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले. नाशिकमध्ये आधाराश्रम ही संस्था घारपुरे घाट, अशोकस्तंभ येथे गेली ६८ वर्षे निराधार बालकांचे संगोपन, पुनर्वसन करते. या संस्थेचा संबंधित वृत्ताशी कोणताही संबंध नाही असे संस्थेचे अध्यक्ष विजय दातार यांनी सांगितले.
आधाराश्रमाचे सचिव सुनीता परांजपे व हेमंत पाठक म्हणाले, सुप्रसिद्ध वैद्य आण्णाशास्त्री दातार यांनी १९५४ साली या संस्थेची स्थापना केली. अधिकृतपणे बालके दत्तक देणारी आधाराश्रम ही नाशिक जिल्ह्यातील एकमेव सरकारमान्य संस्था आहे. सदर बातमीतील नामसाधर्म्यामुळे बऱ्याच हितचिंतक यांचे फोन आल्यामुळे व जनतेचा कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी आम्ही हा खुलासा करीत आहोत. यापूर्वी काहीवेळा आधाराश्रम ही आमचीच संलग्न संस्था असल्याचा खोटा प्रचार काही सस्थांनी केला होता, हे देखील निदर्शनास आले होते असे पाठक यांनी स्पष्ट केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा