आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!
प्रेस नोट 04.10.2022
आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना !
जिल्ह्याला मिळाले ३९ शिक्षक !!
शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!
नाशिक - राज्याच्या शिक्षण विभागाने आंतर जिल्हा बदली प्रक्रियेस मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने आंतर जिल्हा प्रक्रियेस सुरवात केली. आंतर जिल्हा बदलीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या ३९ शिक्षकांना समुपदेशनाने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पदस्थापना दिली,
यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, संतोष झोले, अधीक्षक श्रीधर देवरे, कक्ष अधिकारी रवींद्र आंधळे उपस्थित होते.
शासनाकडून आंतर जिल्हा बदलीने नाशिक जिल्ह्यात पदस्थापना मिळण्यासाठी ९८ शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे अर्ज केला होता यापैकी ३९ शिक्षक हे जिल्ह्यात आज रोजी हजर झाले, यामध्ये संवर्ग १ मध्ये ६, संवर्ग २ मध्ये ८ व सर्वसाधारण २५ अशा ३९ शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली, ही प्रक्रिया पारदर्शीपणे समुपदेशनाद्वारे पार पडली,
यामध्ये जिल्ह्यातील शून्य शिक्षक असलेल्या शाळांमध्ये २० शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्याने या शाळांना आता शिक्षक मिळणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे, वरिष्ठ सहायक सलीम पटेल, दत्तात्रय मदने, विक्रम पिंगळे, अविनाश आहिरे, सुनील सोनवणे, रचना जाधव यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा