गुणवत्तापूर्ण व वैविध्यपूर्ण उत्पादनांचे "न्यू संस्कृती बुटीक" दालनाचे उद्घाटन !

गुणवत्तापूर्ण व वैविध्यपूर्ण उत्पादनांचे "न्यू संस्कृती बुटीक"  दालनाचे उद्घाटन !

नाशिक । महिलांची वस्त्रप्रावरणे एकाच छताखाली उपलब्ध करून देणार्‍या कॉलेजरोड वरील न्यू संस्कृती बुटीक या देखण्या दालनाचे उद्घाटन आरूषी भंडारे हिच्या हस्ते थाटात पार पडले. नाशिककर महिलांच्या अपेक्षांना अनुसरून गुणवत्तापूर्ण आणि वैविध्यपूर्ण उत्पादने दालनात सादर करण्यात आल्याचे गेली दोन दशके या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शीतल भंडारे यांनी यावेळी सांगितले.

       अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, महिलांच्या ड्रेसचे डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्‍चरिंग हे आमच्या दालनाचे वैशिष्ट्य आहे. प्युअर सिल्क, कॉटन, ऑरगेन्जा, अजरक, मसलीन, लिनन या प्रकारांतील ड्रेस मटेरियल, डिझायनर साड्या, रेडीमेड ड्रेसेस तसेच विविध प्रकारांतील दुपट्टे, रेडीमेड प्रिंटेड सिल्क, पटोला बांधणी, सिल्क बांधणी आदी श्रेणींमधील साड्या येथे उपलब्ध राहतील. दरम्यान, उद्घाटन सोहळ्याला डॉ. पुजा पवार, अर्चना तांबे, हेमांगी पाटील, अश्‍विनी भामरे, हेमांगी पाटील, शीतल बिरारी, मिनल सावंत, सोनाली कुटे, सिबल सोनवणे, श्‍वेता पारख, पवित्रा पगार यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !