दहशतवादी संघटना आणि व्यक्तींकडून देशात अनेक ठिकाणी हल्ले होत असताना देश एकसंघ रहावा म्हणून देशाच्या सुरक्षेची जबाबदारी हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे- विशेष सरकारी वकील ऍड.शिशिर हिरे

देशसुरक्षेची जबाबदारी प्रत्येकाचे आद्य कर्तव्य-ऍड.शिशिर हिरे

     नाशिक:- परदेशातील दहशतवादी संघटना आणि व्यक्तींकडून देशात अनेक ठिकाणी हल्ले होत असताना देश एकसंघ रहावा म्हणून देशाच्या सुरक्षेची जबाबदारी हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ऍड.शिशिर हिरे यांनी केले.
     राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या प्रा. जगदीश देवरे यांच्या 'फुलपाखरू' या कादंबरीचे प्रकाशन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनीयर बाळासाहेब मगर, प्रमुख पाहुणे डॉ.प्रशांत पाटील, प्रदीप ठाकरे, मुक्त विद्यापीठाच्या शालेय शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ.कविता साळुंखे, लेखक प्रा.जगदीश देवरे, शीतल देवरे मंचावर उपस्थित होत्या.
   

 ऍड.शिशिर हिरे पुढे म्हणाले की, गंगापूर धरणासारखा या कादंबरीचा मध्यवर्ती विषय हाताळताना किती सावधगिरी बाळगावी लागते, हे लेखकाने या कादंबरीत सिद्ध केले आहे. पहिलीच साहित्यकृती असतानाही या कादंबरीत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना कौतुकास्पद आहेत. अध्यक्षस्थानावरून बोलताना बाळासाहेब मगर म्हणाले की, इस्लामी दहशतवादासह हिंदूंमधील अतिसहिष्णुताही चिंतेची बाब आहे. आजच्या सामाजिक परिस्थिती आणि वास्तव यावर प्रा. देवरे यांनी उत्तमपणे प्रकाश टाकला आहे. भविष्यातील संभाव्य विदारक परिस्थितीपासून सावध करण्याचा सल्लाही देत लेखकाने सामाजिक जबाबदारीचे भान राखले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.कविता साळुंखे, डॉ.प्रशांत पाटील, प्रदीप ठाकरे यांचीही समायोजित भाषणे झाली.
     कादंबरीकार प्रा.देवरे यांनी कादंबरी लेखनाचा प्रवास कथन करत सहकार्य करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू न शकलेले माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्यासह राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे यांनी पाठविलेल्या शुभेच्छासंदेशाचे वाचन पंकज क्षेमकल्याणी यांनी केले. प्रा.प्रकाश अहिरे, कल्पना अहिरे, दिनेश देवरे, प्रा.सुरेश साळुंखे, प्रा.गिरीश कश्यप यांनी स्वागत केले. आभार सागर साळुंखे यांनी मानले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. 100 वर्ड्स च्या अभिजीत शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांनी संयोजन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !