आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने आज ‘फॅशन शास्त्र 2022’ चे आयोजन !

आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने आज ‘फॅशन शास्त्र 2022’ चे आयोजन ! 

त्र्यंबकरोड वरील ग्रेप कौंटीच्या टर्फवर सायंकाळी रंगणार कार्यक्रम !!

       नाशिक : सौंदर्य शास्त्राशी निगडीत आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची कवाडे नाशिककरांसाठी खुली करून देणाऱ्या आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या वतीने रविवारी (दि. ३०) ‘फॅशन शास्त्र 2022’ या मेगा इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकरोड वरील ग्रेप कौंटीच्या टर्फवर सायंकाळी रंगणाऱ्या या इव्हेंटच्या मोफत प्रवेशिका फॅशन प्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

         यासंदर्भात माहिती देताना अकॅडमीच्या संस्थापिका तथा व्यवस्थापकीय संचालिका भाग्यश्री धर्माधिकारी यांनी सांगितले, ‘फॅशन शास्त्र 2022’ कार्यक्रमाचे औचित्य साधून १२० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. अप्सरा या थीमवर आधारित फॅशन शो उपस्थितांना स्वर्गीय सौंदर्याच्या मॉडेल्सचे दर्शन घडवेल. यानिमित्त प्रथमच नाशिककरांना वैविध्यपूर्ण सौंदर्यवतींचे पदलालित्य अनुभवयास मिळणार आहे. याप्रसंगी मराठी, मुस्लीम, राजवाडी, बंगाली, क्याथलिक, दाक्षिणात्य, मणिपुरी आदी श्रेणींतील ब्रायडल लुक देखील वेगळेपण अधोरेखित करतील. या कार्यक्रमात रशिया, कोरिया, युक्रेन, दुबई आदी ठिकाणच्या मॉडेल्स आपापल्या अविष्काराचे सादरीकरण करणार असल्याचे भाग्यश्री धर्माधिकारी म्हणाल्या. सदर कार्यक्रमास पालकमंत्री दादाजी भुसे, खा. हेमंत गोडसे, माजी नगरसेवक रमेश धोंगडे यांची विशेष अथिती म्हणून उपस्थिती राहणार आहे.  


        आयबीटी इंटरनॅशनल ब्युटी अकॅडमीच्या नाशिक शहरात नाशिकरोड, इंदिरा नगर आणि गोविंद नगर येथे शाखा अस्तित्वात आहेत. मेकअप, स्कीन, हेअर, सेमी-पर्मनंट मेकअप आदी श्रेणींसाठी अकॅडमीचा सार्वत्रिक लौकिक आहे. दरम्यान, आज ‘फॅशन शास्त्र 2022’च्या मोफत प्रवेशिकांसाठी ७७७००७०१०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य प्रायोजक ‘मुहूर्त सेलेब्रेशन’ दालनाचे संचालक विनीत राजपाल आणि इंदिरा नगर शाखेचे समन्वयक श्रीपाद ठोंबरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !