" कर्मचारी बँक सभेत सभासदांचा अनावश्यक व अवाजवी खर्चास सभासदांचा कडाडून विरोध "

.           *प्रेस नोट*

" कर्मचारी बँक सभेत  सभासदांचा अनावश्यक व अवाजवी खर्चास सभासदांचा कडाडून विरोध "

       नाशिक(प्रतिनिधी)::-नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या दि.२४/०९/२०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेच्या स्मरणिका छपाई व तारांकित हॉटेल येथे झालेल्या अनावश्यक व अवाजवी खर्चास विरोध करून खर्च नामंजूर करण्यात आला.
       तसेच सभासदांना ५ %  वरून ७ % अशी लाभांश मागणी करून वाढवून घेतले.   
कर्जाचे व्याजदर कमी करावे. ठेवी वरील व्याज दर वाढवावे, कर्ज घेताना ठेव व एक हप्ता आगाऊ घेण्यात येऊ नयेत. संचालक मंडळाची मुदत संपली असल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेऊ नका असा सहकार कायदा असून येवला येथे जागा घेण्यास विरोध करण्यात आला अशा सभासद हिताच्या सूचना रवींद्र थेटे, उत्तमराव (बाबा) गांगुर्डे, निलेश देशमुख, दादाभाऊ निकम, विक्रम पिंगळे, अभिजीत घोडेराव, उमेश देशमानकर, नंदकिशोर सोनवणे, सचिन विंचुरकर, सचिन पाटील आदींनी मांडल्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !