जिल्ह्यातील ७५ आरोग्य संस्थांमध्ये गरोदर मातांना आरोग्य सेवा देऊन आरोग्य विभाग साजरा करणार आजादीका अमृत महोत्सव !
जिल्ह्यातील ७५ आरोग्य संस्थांमध्ये गरोदर मातांना आरोग्य सेवा देऊन आरोग्य विभाग साजरा करणार आजादीका अमृत महोत्सव !
नासिक (प्रतिनिधी)::- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वस्थ भारत चे स्वप्न साकार करण्यासाठी जि. प. आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय नाशिक, स्त्री रुग्णालय मालेगाव, ३२ ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे १३ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या संकल्पने नुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे सनियंत्रणाखाली विशेष गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गरोदर मातांचे आरोग्य चांगले राहावे. गरोदरपणामध्ये विशेष स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी व्हावी तसेच त्यांना औषधोपचार, आहार सल्ला, बालकाची काळजी याविषयी मार्गदर्शन मिळावे तसेच जोखमीच्या मातांचे प्रमाण कमी करणे, माता व बालक मृत्यू कमी करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गरोदर मातांचे आरोग्य चांगले राहावे. गरोदरपणामध्ये विशेष स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी व्हावी तसेच त्यांना औषधोपचार, आहार सल्ला, बालकाची काळजी याविषयी मार्गदर्शन मिळावे तसेच जोखमीच्या मातांचे प्रमाण कमी करणे, माता व बालक मृत्यू कमी करण्यासाठी आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत या विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ तालुक्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालय नाशिक सह ३२ ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांकडून गरोदर मातांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. अति जोखमीच्या मातांना आरोग्य सेवा देऊन त्यांना जोखमीपासून संरक्षित कसे करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गरोदरपणात लागणारी औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रक्त वाढीच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या तसेच गरजू गरोदर मातेला सोनोग्राफी करावयाचे असल्यास संदर्भ सेवा दिली जाणार आहे. देशहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कुटुंब नियोजन त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. कुटुंब नियोजनाच्या कायमच्या व तात्पुरत्या पद्धतीविषयी माहिती दिली जाणार आहे. स्त्रियांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी पुरुषांनी कुटुंब नियोजनामध्ये सहभाग वाढवणे कामी पुरुष नसबंदी याविषयी विशेष जनजागृती करण्यात येणार आहे. गरोदर मातेचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया या याविषयी समुपदेशन करणे यासाठी आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत असताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, या विशेष गरोदर मातेला आरोग्य सेवा देण्याच्या शिबिरासाठी सज्ज झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी यासाठी विशेष प्रयत्न करून हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी गरोदर मातांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या तपासणीसाठी स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांची विशेष नेमणूक करून प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना डॉक्टर कसे उपलब्ध होतील व त्यांची सेवा प्रत्येक गरोदर मातेला कशा पद्धतीने मिळेल याचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत डॉ. कपिल आहेर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सर्व प्रकारचे औषधे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. सदर शिबिराच्या आयोजन करण्यासाठी पंधरा तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, ग्राम आरोग्य अधिकारी, ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, महालॅबचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहाय्यक, सहायिका, आशा, हे सर्व शिबिर यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. आशा आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृह भेटी देऊन प्रत्येक गरोदर मातेची माहिती घेऊन जोखमीच्या तसेच कमी वजनाच्या गरोदर मातांना या शिबिराचा लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करीत आहेत. नियोजित शिबिराचे ठिकाणी घेऊन जाण्यासाठी वाहन व्यवस्था, आहार व्यवस्था करण्यात आली असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा स्तरावरून डॉ. युवराज देवरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन खरात, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. सुनील राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी, बाह्य रुग्ण हे सनियंत्रण करीत असून जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये या शिबिराची जनजागृती करण्यात येत आहे. गल्लोगल्ली ध्वनीक्षेपकावरून माहिती देणे, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे तर्फे जनजागृती करण्यात येत आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आशामार्फत सदर शिबिरामध्ये येऊन प्रत्येक गरोदर मातेने आपली स्त्री रोग तज्ञांकडून तपासणी करून घ्यावी व आपले बाळंतपण सुखरूप आणि सुरक्षित व्हावे यासाठी आरोग्य विभागाने आयोजित केलेला शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा