नवनवीन जीवनकौशल्ये आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास घडवावा - समीर भुजबळ

नवनवीन जीवनकौशल्ये आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास घडवावा - समीर भुजबळ

 तीन दिवसीय कार्यशाळेचा उत्साहात समारोप 

  नाशिक ( प्रतिनिधी ) - विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवर नवीन काय घडतंय हे जाणून घेतले पाहिजे. नवनवीन जीवनकौशल्ये शिकून आत्मसात केली पाहिजेत. त्यातूनच व्यक्तिमत्त्व विकास होतो. सर्वांगीण जीवन समृद्ध होते असे प्रतिपादन भुजबळ नॉलेज सिटीच्या मेट स्कूल आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईनचे विश्वस्त समीर भुजबळ यांनी केले. सात यशस्वी कार्यशाळांच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

     संस्थेच्या वतीने गोवर्धन कॅम्पस येथे  दि. १ ते ३ सप्टेंबर २०२२ दरम्यान " आर्ट अँड क्राफ्ट  कार्यशाळांचे  आयोजन करण्यात आले. त्यात चित्रपट निर्मिती, नाट्याविष्कार, डिझाइन थिंकिंग, विणकाम, पॉटरी, बांबू रचना, 
लाकडावरील कोरीवकाम व प्रिंट यांचा समावेश होता.काल त्याचा समारोप झाला. यावेळी विश्वस्त समीर भुजबळ, ट्रस्टच्या संचालिका शेफाली भुजबळ, इन्स्टिट्यूटचे संचालक वास्तुविशारद भालचंद्र चावरे, प्राचार्या कृष्णा राठी तसेच अक्षता मोकाशी, योगेश कांबळे , आर्कि. श्रेयांक खेमलापुरे व आर्कि. अजय सोनार, अक्षय इंदलकर, अंशुल सिंग, श्रुतिका केळुस्कर, सोनाली माजलकर आदी मार्गदर्शक उपस्थित होते. प्रारंभी नाशिक या विषयावरील विद्यार्थ्यांनी केलेल्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. तीन नाटिका सादर करण्यात आल्या. भालचंद्र चावरे म्हणाले, तीन दिवसात २५० विद्यार्थ्यांनी स्वतःचा शोध घेतला. विचारांना चालना मिळाली. आपल्यातील भरपूर क्षमतांची ओळख होऊन आत्मविश्वास वाढला. प्रसन्न मन व समतोल एकाग्रतेने प्रभावी मांडणी कशी करता येते याचा वस्तुपाठ आलेल्या सर्वच दिग्गज मार्गदर्शकांनी दिला. त्याचा पुढील अभ्यासक्रमात निश्चितच उपयोग होईल असे त्यांनी नमूद केले. प्राचार्या कृष्णा राठी यांनी तीन दिवस हसतखेळत मिळवलेली कौशल्ये आयुष्यभर साथ देतील असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा गडकरी व वैभव अभंग यांनी केले.
    विद्यार्थ्यांनी मनोगतात या तीन दिवसाच्या कार्यशाळांमधून कार्यानुभवाचा आनंद घेता आला, प्रतिभाशक्ती वाढण्यास चालना मिळाली असे अनुभव व्यक्त केले. संस्थेच्या वतीने वास्तुकला व डिझाईन च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नव्याने वास्तुकला अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या आणि राष्ट्रीय वास्तुकला प्रवेशपत्रिका २०२२ पात्र असलेल्या विध्यार्थ्यांना या उपक्रमात अल्प शुल्कात सहभागी होता आले. मेट स्कूल आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन, गोवर्धन येथे तीन दिवस विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी, पालक, नामवंत वास्तुविशारद, व्यावसायिक इंटेरिअर डिझानर्स व जाणकार जिज्ञासू नागरिकांनी भेट दिली. वास्तुकला (आर्किटेक्चर) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'ओरिएंटेशन प्रोग्रॅम' चे आयोजनही करण्यात आले. ज्यात वास्तुकला या विषयी व या व्यसायातील संधी याविषयांवर तज्ज्ञांशी व उपस्थित प्राध्यापकांशी चर्चा झाली. प्रवेश प्रक्रिये संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.  इच्छुक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी त्याचा लाभ घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !