'मृतकाचे नांव काय ?'विनोदाचा आस्वाद विनामूल्य घ्या !बाबाज् थिएटर्सच्या वर्धापनदिनानिमित्तपाच दिवसांचा ' रोटरी कल्चरल फेस्ट !
'मृतकाचे नांव काय ?'
विनोदाचा आस्वाद विनामूल्य घ्या !
पाच दिवसांचा ' रोटरी कल्चरल फेस्ट !
नाशिक ( प्रतिनिधी ) बाबाज् थिएटर्स या ख्यातनाम सांस्कृतिक संस्थेचा २२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने ५ दिवसांच्या ' रोटरी कल्चरल फेस्ट ' चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१४ ते १८ सप्टेंबर दरम्यान प. सा. नाट्यगृहात दररोज सायंकाळी ५.३० वाजता हा विनामूल्य सोहळा होणार आहे. काल पत्रकार परिषदेत बाबाज् थिएटर्सचे अध्यक्ष प्रशांत जुन्नरे, रोटरी क्लब ऑफ नाशिकरोडच्या अध्यक्षा वर्षा जोशी, सचिव ज्ञानेश वर्मा यांनी अशी माहिती दिली.
दि.१४ रोजी ज्ञानेश वर्मा प्रस्तुत 'रागरंग 'हा हिंदी चित्रपटातील रागदारीवर आधारित कार्यक्रम होईल. दि.१५ रोजी रोहित पगारे लिखित व दिग्दर्शित ' मृतकाचे नाव काय ? ' या सामाजिक व विनोदी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. दि.१६ रोजी ' एव्हरग्रीन लता - आशा ' ही सुरेल गीतांची मैफल अमोल पाळेकर व सहकारी सादर करतील. दि.१७ रोजी झी मराठी प्रस्तुत ' उत्सव नात्यांचा ' कार्यक्रमात विविध मालिकांमधील कलाकार नाशिककरांच्या भेटीला येणार आहेत. दि.१८ रोजी वर्धापनदिनानिमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मान्यवर कलाकारांचा सत्कार होईल. त्यानंतर कलानंद कथक नृत्यसंस्था व लेहरिशा बँडतर्फे ' ऋतुचक्र ' हा कार्यक्रम होणार आहे. पत्रकार परिषदेला एन.सी. देशपांडे, अश्विनी सरदेशमुख व सहकारी उपस्थित होते. त्यांनी सर्व रसिकांनी या विनामूल्य सोहळ्याला उपस्थित राहून आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा