२३ वे ग्रामीण साहित्य संमेलन नाशिक मध्ये ! आयोजकांकडून संमेलनाची रुपरेषा जाहीर !!
२३ वे ग्रामीण साहित्य संमेलन नाशिक मध्ये !
वाडीव-हे ::- इगतपुरी तालुका साहित्य मंडळाचे २३ वे ग्रामीण साहित्य संमेलन ५ व ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये नाशिक येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा जेष्ठ ग्रामीण साहित्यिक पुंजाजी मालुंजकर यांनी दिली आहे.
हे दोनदिवसीय साहित्य संमेलन नाशिक येथील मानवधन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या पाथर्डी फाटा येथील शैक्षणिक प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे.हे दोन दिवशीय साहित्य संमेलन सहा सत्रात संपन्न होणार असून ग्रंथ दिंडी, उद्घाटन सोहळा, निमंत्रितांचे कवी संमेलन, व्याख्यान, परिसंवाद, पुरस्कार वितरण, कथा कथन, खुले कवी संमेलन असा भरगच्च कार्यकम होणार असून सहित्यिकांनी या साहित्य संमेलनात अवश्य सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
या अगोदर इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने २२ ग्रामीण साहित्य संमेलन इगतपुरी तालुक्यातील विविध भागात भरवून अनेक नव सहित्यिकांना प्रेरणा देणारे ठरले आहे, यातून प्रेरणा घेवून अनेक साहित्यिक महाराष्ट्रात साहित्याची परंपरा जोपसत आहे. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर सहित्यिकांचा सहभाग असतो.
या प्रसंगी मंडळाचे विश्वस्त अड.ज्ञानेश्वर गुळवे, ग्रंथमित्र बाळासाहेब पलटणे, मानवधन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, लेखक दत्तात्रय झनकर, हिरामण शिंदे, रविन्द्र पाटिल आदि मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा