निर्मिती पतसंस्थेस दिड कोटीचा विक्रमी नफा ! सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर !!
निर्मिती पतसंस्थेस दिड कोटीचा विक्रमी नफा !
सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर !!
नाशिक ( प्रतिनिधी ) निर्मिती पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून राजलक्ष्मी बँकेचे संचालक जगन (अण्णा) पाटील व नाशिकमधील प्रख्यात वास्तुविशारद अरुण काबरे उपस्थित होते. यावेळी गतवर्षीच्या तुलनेत ४४ लाखांची वाढ होऊन १ कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे सांगण्यात आले. सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. निर्मिती पतसंस्था ही बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगले काम करत असल्याचे जगन(अण्णा) पाटील यांनी नमुद केले. संस्थेच्या संचालकांनी योग्य नियोजनामुळे संस्थेचा कारभार प्रगतीपथावर नेला आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रात संस्थेने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संस्थेचे कामकाज हे कौतुकास्पद असल्याचे नमुद केले. आर्कि.अरुण काबरे यांनी मनोगतात संस्थेची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे सांगितले व निर्मिती पतसंस्थेने जीवनगौरव केल्याबद्दल आभार मानले. ३१ मार्च अखेर निर्मिती पतसंस्थेस १ कोटी ५४ लाखापेक्षा जास्त निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर्कि. सुरेश गुप्ता यांनी दिली. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत व आर्थिकमंदीच्या काळात सहकार क्षेत्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करून निर्मिती पतसंस्थेच्या ठेवींमध्ये ११ टक्के वाढ झाली आहे असे ते म्हणाले.
आर्थिक वर्षात संस्थेकडे ३२ कोटी १२ लाखाच्या ठेवी असून आजमितीस संस्थेत ३८ कोटी ५० लाखाच्या ठेवी आहेत. तसेच संस्थेने आर्थिक वर्षात ६७.४४ टक्के म्हणजे २५ कोटी ६७ लाख कर्ज वाटप केलेले आहे. गुंतवणुक १३ कोटी ९५ लाख व बँकामध्ये ६७ लाख शिल्लक आहे. तसेच संस्थेचे भागभांडवल १ कोटी ५८ लाख असून स्वनिधी ५ कोटी ०६ लाख इतका आहे. सर्व तरतुद वजा जाता मागील वर्षाच्या तुलनेत ४४ लाखाची वाढ होवून १ कोटी ५४ लाखा पेक्षा जास्त नफा झाला आहे. संस्थेचा एकुण व्यवसाय ४२ कोटीचा झालेला आहे. त्यामुळे संस्था आपल्या पायावर भक्कमरित्या उभी आहे. कर्जदारांना १३ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप बेडसे यांनी मागील ४ वर्षांप्रमाणे यावर्षीही १५ टक्के लाभांश देण्याची घोषणा केली.
संस्थेचे माजी अध्यक्ष मधुकर फटांगरे यांनी नफा तोटा पत्रक व अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेले खर्च सभेपुढे मांडले. आर्कि.संजीव बोरसे यांनी अंदाजपत्रक मांडले, ओमप्रकाश जाजु यांनी दोषदुरुस्ती अहवाल व सन २२ -२३ साठी लेखापरिक्षकांची नेमणुक करणे याबाबत विषय मांडले. जनसंपर्क संचालक सुहास शुक्ल यांनी आभार मानले. संस्थेच्या कार्यालय नुतनीकरणाबाबतचा विषय संचालिका अनिला अग्रवाल यांनी सभेपुढे मांडला. सभासद मराठा विद्याप्रसारकचे नवनिर्वाचीत संचालक ॲड लक्ष्मण लांडगे यांचा सत्कार संस्थेच्यावतीने संचालक के.डी पाटील यांनी केला तसेच सभेचे सुत्रसंचालन ही केले. सभेत ठेवीदार व कर्जदार यांचा तसेच संचालकांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सभेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आर्कि. सुरेश गुप्ता, उपाध्यक्ष प्रताप बेडसे, सचि व आर्कि. सत्यप्रकाश गुप्ता, जनसंपर्क संचालक सुहास शुक्ल, संचालक मधुकर फटांगरे, के.डी पाटील, आर्कि.संजीव बोरसे, ओमप्रकाश जाजु, अनिला अग्रवाल, इंदिरा बटाविया, आर्कि.रवि पारूंडेकर, दत्तात्रय माळोदे, सुरेश शहा, ठा.भरतसिंग व्यासपीठावर उपस्थित होते. व्यवस्थापक सुदर्शन लोळगे, दीपक भडांगे, नारायण बढे व नितिन काळे यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा