राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली 'झिरो एनर्जी स्कूल' यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या ‘जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक खैरे यांना नेशन बिल्डर अवार्ड जाहीर !

जिल्हा परिषद शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक खैरे यांना नेशन बिल्डर अवार्ड  जाहीर !

 वाबळेवाडी शाळेच्या  शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
ता.०३ (पुणे प्रतिनिधी)::- वाबळेवाडी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक दीपक बबनराव खैरे यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचा नेशन बिल्डर अवार्ड  नुकताच जाहीर झाला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती रोटरी क्लब शिक्रापूरचे अध्यक्ष विरधवल करंजे, सचिव डॉ. मिलिंद भोसुरे आणि पब्लिक इमेज डायरेक्टर मनोहर परदेशी यांनी नुकतीच दिली.

       रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. समाजात उत्कृष्ट सामाजिक आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण्याचे काम ही संस्था करत असते. दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाचे औचित्य साधून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना जिल्हा परिषद शिक्षणाधिकऱ्यांच्या हस्ते नेशन बिल्डर अवार्ड  देऊन सन्मानित करते. यावर्षीही संस्थेच्या वतीने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

             राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली 'झिरो एनर्जी स्कूल' यासह विविध वैशिष्ट्यामुळे नावारुपाला आलेल्या पुणे जिल्ह्यातील ‘जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाबळेवाडी येथील तंत्रस्नेही शिक्षक दीपक बबनराव खैरे यांना रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचा नेशन बिल्डर अवार्ड जाहीर झाल्याची माहिती रोटरी क्लब शिक्रापूरचे अध्यक्ष विरधवल करंजे, सचिव डॉ मिलिंद भोसुरे आणि पब्लिक इमेज डायरेक्टर मनोहर परदेशी यांनी नुकतीच दिली. त्याचे अधिकृत पत्र नुकतेच त्यांनी दीपक खैरे यांना दिले आहे.
         वाबळेवाडी शाळेत दीपक खैरे गुरुजींना नेशन बिल्डर अवार्ड जाहीर झाल्याचे कळताच विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी शाळेतील मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. वाबळेवाडी शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. त्यांना पुरस्कार जाहीर होताच शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
             नेशन बिल्डर अवार्ड म्हणजे एक प्रकारे जबाबदारी. येथून पुढील काळात विद्यार्थी आणि शाळेसाठी अशाच प्रकारचे काम करून शाळेच्या गुणवत्ता विकास वाढीसाठी प्रयत्न करीन. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवून आपल्या सर्वांच्या सहकार्याने शाळा प्रगतीपथावर नेण्याचे काम करत राहील, असे मत यावेळी सत्कारमूर्ती दीपक खैरे यांनी व्यक्त केले.
                 याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. 
            तर  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे,  ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक  केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, प्रकाश वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी केले तर शिष्यवृत्ती तज्ञ तुषार सिनलकर यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !