नासिक जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदे गटात !
नाशिक पंचायत समिती माजी सभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल ढिकले यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नासिक जिल्हाप्रमुख पदावर त्यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित संघटीत नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, खासदार हेमंत गोडसे, यांसह सरपंच परिषदेचे अध्यक्ष तानाजी गायकर, भाऊसाहेब काका ढिकले, भाऊसाहेब नाना ढिकले, मनोज जाधव, अंबादासपंत ढिकले, दत्ता भाई ढिकले, त्र्यंबक पगार, बाळासाहेब ढिकले,नामदेव ढिकले यांचा प्रवेश करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा