नविन पेन्शन योजना रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा ! "कर्मचाऱ्यांचे बाईक रॅलीव्दारे आंदोलन...!!"



नविन पेन्शन योजना रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा... "  
कर्मचाऱ्यांचे बाईक रॅलीव्दारे आंदोलन...



         नासिक (प्रतिनीधी )::-राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी मंहासंघाचे निर्देशानुसार आज दि.२१ सप्टे. रोजी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक - शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीचे वतीने नविन पेन्शन योजना रद्द करुन सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा. या मागणीसाठी जिल्हा स्थरावर गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय समोर छत्रपती शिवाजी स्टडीयम वर रॅलीची सांगता करण्यात आली.


तालुका स्थरावर सर्व पंचायत समित्या ते तहसिल कार्यालये असे बाईक रॅलीचे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफाडे यांचे मार्फत निवेदन दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार हळदे, सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, विक्रम पिंगळे यांनी दिली.
       राज्य शासनाने २००५ पासून  सेवेत नियुक्त झालेले कर्मचारी, शिक्षक यांना नविन पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केल्याने राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या नैतृत्वाखाली समन्वय सामितीने सातत्याने राज्यव्यापी आंदोलने केली आहे. परंतु शासणाकडून या मागणी संदर्भात चालढकलच केली जात आहे.
       ऑगष्ट १८च्या तीन दिवशीय राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नविन पेन्शन योजनेच्या पुनर्विचार बाबत अर्थ राज्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखाली अभ्यास गट समिती गठीत करण्यात आली. परंतु या समितीने जुनी पेन्शन योजना लागू करणेसाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर दि. २३ व २४ फेब्रु.२२ च्या राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे वेळी दि.२२  फेब्रु.२२ रोजी तात्कालीन उपमुख्यमंत्र्यां सोबत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू  करणे संदर्भात नव्याने फेरविचार करण्याचे आश्वासन देवुनही शासणाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. दरम्यानच्या काळात राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, या राज्यांनी, नविन पेन्शन योजना रद्द करून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. इतरही काही राज्यात जुनी पेन्शन लागू करणे साठी हालचाली सुरू आहेत. मात्र पुरोगामी विचाराचे महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप पावेतो जुनी पेन्शन योजना लागू करणेचा निर्णय घेतला नसल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त करून प्रातिनिधीक स्वरूपात आज बाईक रॅलीचे आंदोलन करण्यात आले.
       खासदार, आमदार यांना आजही नविन पेन्शन योजना लागू नसतांना नविन पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या जमा रक्कमांचा हिशोब नाही. याशिवाय जमा रक्कमा फंड मॅनेजरना शेअर बाजारात गुंतवणूकीची मुभा असल्याने संभाव्य काळात कर्मचाऱ्यांना पेन्शनचे लाभ मिळतीलच याची शाश्वती नसल्याने नविन पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांचे हिताची नसल्याने ती रद्द करून सर्वाना जुनी पेन्शन योजनाच लागू करा. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
यावेळी महासंघाचे कोषाध्यक्ष जे. डी. सोनवणे जिल्हा परीषद प्रवर्ग संघटनेचे, श्रीधर सानप, सुनिल निकम, किरण निकम, प्रमोद निरगुडे, किशोर वारे, अजित आव्हाड, राजेश आहेर, अजय कस्तुरे, सागर कारंडे, विलास शिंदे, राकेश जगताप, योगेश बोराडे, कानिफ फडोळ, प्रशांत कवडे, ज्ञानेश्वर गायकवाड, दिलीप टोपे, दिपक भदाणे, सुरेश भोये, कविता पवार, रचना जाधव, मनिषा जगताप, स्वाती बेंडकोळी, संगीता ढिकले, अर्चना दप्तरे, भास्कर कुवर, किशोर वाघ, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !