भाजपा गणेशोत्सव स्पर्धा २०२२ कोण ठरणार "विजेता ?"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार बक्षीस वितरण सोहळा !

भाजपा गणेशोत्सव स्पर्धा २०२२ कोण ठरणार "विजेता ?"

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार बक्षीस वितरण सोहळा !

        मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई भाजपा यांच्या वतीने अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ व कोकण विकास आघाडी यांच्या सहकार्याने, 'मुंबईचा मोरया गणेशोत्सव स्पर्धा २०२२' चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी, सायंकाळी ६.०० वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्तें, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत, संपन्न होणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनौबत व कोकण विकास आघाडीचे सुहास आडीवरेकर यांनी निमंत्रणपत्राद्वारे दिली आहे.

       या स्पर्धेचे संयोजक मुंबई बँकेचे अध्यक्ष - आमदार प्रवीण दरेकर व संचालक प्रसाद लाड आहेत. या स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट मूर्ती, सर्वोत्कृष्ट सजावट, व देखावा आणि सर्वोत्कृष्ट परिसर स्वच्छता या विभागासाठी प्रत्येकी तीन पारितोषके देण्यांत येणार आहेत. त्याशिवाय ११ उत्तेजनार्थ पारितोषके देण्यात येणार आहेत. 
           या सोहळ्या प्रसंगी जीवनगाणी निर्मित, "नवा श्री गणेशा एक संगीत नृत्य सोहळा" संपन्न होणार आहे. यामध्ये अनेक नामवंत कलाकार भाग घेणार आहेत. तुमचे योगदान, कौशल्य, कलात्मकता, यांच्या कौतुकाने नवी प्रेरणा घेण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह सदर कार्यक्रमास यावे, असे आवाहन मुंबई भाजपाचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यासह मुंबई भाजपाचे सहा जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !