बाल विकास सेवा योजना प्रकल्पांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव !

राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२२ शुभारंभ

बाल विकास सेवा योजना प्रकल्पांचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

नाशिक - सन २०१८ मध्ये मा. पंतप्रधान कार्यालयाचा महत्वपूर्ण कार्यक्रम म्हणून महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सदर कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता शासनाच्या इतर विभागांमध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येते.
        महिला व बालकांच्या आरोग्य व पोषण विषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता जनजागृती हा घटक महत्वपूर्ण ठरतो. समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्याकरिता पोषण अभियानांतर्गत दरवर्षी पोषण महिना व पोषण पंधरवडा साजरा करण्यात येतो व या उपक्रमांद्वारे जन आंदोलनातून समाजामध्ये जागृती घडवून आणण्याकरिता प्रयत्न केला जातात. या वर्षी सप्टेंबर २०२२ हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देशित केलेले असून सदर कार्यक्रमात लोकांचा सक्रिय सहभाग आण्याकरिता विविध उपक्रमांचे नियोजन करण्याचे केंद्र शासनाने सूचित केलेले आहे. 
          महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाण पोषण अभियानामध्ये विविध उपक्रम आयोजित केले जात आहे. जेणेकरुन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये पूर्व शालेय शिक्षण, आहार आरोग्य याविषयी जागृती निर्माण करता येईल. त्यानुसार राष्ट्रीय पोषण महिन्यामधील सर्व विभागामध्ये समन्वय व अभिसरण राखण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागाची भूमिका महत्वपूर्ण ठरते.
            पोषण माह साजरा करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर केंद्र शासनानं सुचविलेल्या संकल्पनेवर आधारित उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये स्वस्थ बालक-बालिका स्पर्धेचा देखील समावेश असून केंद्र शासनाने सदर स्पर्धेची रुपरेषा पाठविलेली आहे.
           माहे सप्टेंबर २०२२ मध्ये पोषण महिना साठी पोषण ग्रामपंचायतींना सक्रिय करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे. त्यादृष्टीने गावपातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायतांना पोषण माह मधील उपक्रमांचा मुख्य आधार / कणा बनवून या उपक्रमाचे लोकसहभागात रूपांतर करणे, तसेच ग्रामपंचायती आणि ग्रामपंचायतीच्या विविध स्थायी समित्यांच्या माध्यमातून पोषणाकरिता लोकसहभाग ही संकल्पना साकार होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
                 सप्टेंबर २०२२ राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा  करणेसाठी केंद्र शासनामार्फत सुचविण्यात आलेल्या  संकल्पनेद्वारे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिनाचा शुभारंभ आज नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास श्री दिपक चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर जिल्ह्यातील सर्व बालविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते.
           राष्ट्रीय पोषण अभियान नाशिक जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून नाशिक जिल्हा कुपोषण मुक्त करावा अशा सूचना सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या.
***********************************

राष्ट्रीय पोषण अभियान सन 2021-22 मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी उमराळे, देवळा, सुरगाणा सिन्नर ,येवला या  बाल विकास सेवा योजना प्रकल्पांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन  नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !