आई वडीलांच्या अकल्पित निधनानंतर त्यांच्या इच्छेला भूषण ने विधी परीक्षेत प्रथम श्रेणीत येत संयमाने गवसणी घातली !


भूषण ओवे विधी परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या एल. एल. बी. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे विवेकानंद विधी महाविद्यालयात शिकणार्‍या भूषण गिरीष ओवे ७०% गुणांसह प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.    
      वडीलांचं आपत्कालीन निधन त्यानंतर आईने अविरत घेतलेले परिश्रम. कोरोना काळात तिचंही ह्या मुलांना एकाकी करून देवाघरी निघून जाणं. अशा विपरीत परिस्थितीत मनाचा जराही संयम ढळू न देता भूषण यांनी आपल्या आईचं स्वप्न साकार केलं. भूषण ओवे यांचे यश नेत्रदिपक असेच आहे. आज त्यांनी आपलं "भूषण" हे नाव सार्थ ठरवलं. विधी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल भूषण ओवे यांचे परिवारातील सदस्य, मित्रपरिवार आणि समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !