स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिक काॅ. श्रीपाद अमृत डांगे कुटुंबियांचा सन्मान व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन !


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिक काॅ. श्रीपाद अमृत डांगे कुटुंबियांचा सन्मान व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन !

        नाशिक - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या वारसांचा नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे योगदान अनन्यसाधारण होते. ब्रिटिश काळात महाविद्यालयीन जीवनात विल्सन कॉलेजमध्ये असताना कॉम्रेड डांगे यांनी मराठी भाषा मंडळासाठी व पदवी अभ्यासक्रमात इंग्रजी व फ्रेंच भाषेसारखाच मराठी भाषेचा समावेश व्हावा यासाठी विद्यार्थ्यांचा संप घडवून आणला होता. भारताच्या कामगार चळवळीच्या उभारणीत कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा सिंहाचा वाटा होता, संयुक्त महाराष्ट्र लढा व गोवा मुक्तिसंग्रामात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे अग्रभागी होते. डांगे यांचे मूळ गाव हे निफाड तालुक्यातले करंजगाव असल्याने स्वातंत्र्य संग्रामात नाशिक जिल्ह्याचे नाव हे सोनेरी गौरवाने अक्षराने कोरले गेले. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल नाशिक जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात केले होते. या कार्यक्रमासाठी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे वारस म्हणून त्यांची नात संध्या अडवाणी, नातू नितीन देशपांडे हे विशेष निमंत्रित होते. 

        कार्यक्रमाची सुरुवात "वंदे मातरम" ने करण्यात आली. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक कॉग्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रतिमा पुजन सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिक कॉग्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे कुटुंबियांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे नोडल अधिकारी रवींद्र परदेशी यांनी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कार्याबद्दल माहिती सांगत जिल्हा प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. कॉमेड श्रीपाद अमृत डांगे यांच्याबाबात करंजगाव येथील ग्रामस्थ सुनिता राजोळे, मुंबई काँग्रेसचे सचिव व डांगे कुटुंबियांचे स्नेही अनिल गणाचार्य, स्वातंत्र्यसैनिक कॉ. पांडुरंग शिंदे यांनी आपले विचार मांडले. कॉमेड श्रीपाद अमृत डांगे यांची पणती आशना अडवाणी यांनी आपल्या पणजोबा यांच्याबद्दल भावना व्यक्त करत जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाबद्दल संपूर्ण कुटुंबियांच्या वतीने आभार व्यक्त केले. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्याबाबत आपले विचार व्यक्त करत व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन्मापत्राचे वाचन केले. यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी स्वातंत्र्य सैनिक कॉ. श्रीपद अमृत डांगे यांच्या कुटुंबियांना सन्मानपत्र प्रदान केले. जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी डांगे यांचे कुटुंबीय व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह करंजगाव येथील नागरिक जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.


       करंजगांवकरांकडून डांगे कुटुंबीयांचा सत्कार - डांगे यांचे मूळ गाव हे निफाड तालुक्यातले करंजगाव असल्याने करंजगाव येथील ग्रामस्थांकडून डांगे कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.


      दिव्यांगांना युडीआयडी कार्डचे वापट -
या कार्यक्रमाप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी १० दिव्यांग नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात युडीआयडी कार्डचे वापट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !