आवाज की दुनिया का बेताज बादशहा ! तुम मुझे यु भुला न पाओगे.


आवाज की दुनिया का बेताज बादशहा  !
 

तुम मुझे यु भुला न पाओगे.

       स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेले पार्श्वगायक मोहम्मद (महम्मद) रफी यांचा  ३१ जुलै हा स्मृतिदिन. रफींना जाऊन आज ४० हून अधिक वर्षे लोटली असली तरी त्यांचा आवाज भारतीय संगीत रसिकांच्या कानावर पडला नाहीअसा एकही दिवस गेला नसेल.  गेल्या कित्येक वर्षांत अनेकांनी 'प्रति रफीबनण्याचा प्रयत्न केला. मात्रकोणालाही रफींच्या जवळपासही फिरकता आले नाही, यातच रफींच्या गायकीचे वेगळेपण अधोरेखित होते. रफींनी अजरामर केलेल्या गीतांची यादी अफाट असून त्यांच्या  क्या हुआ तेरा वादा...(हम किसीसे कम नही),बहारों फूल बरसाओ...(सूरज), बाबूल की दुवाएँ लेती जा...(नीलकमल), ए रेश्मी जुल्फें...(दो रास्ते), उड़े जब जब जुल्फें तेरी ...(नया दौर), ओ दुनिया के रखवाले... (बैजू बावरा) आदी गीतांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी उर्दू, पंजाबी, मराठी आणि तेलगू भाषेतही गाणी गायली. त्यांचे ‘हा रुसवा सोड सखे...’ हे गाणे ऐकताना एक अमराठी माणूस गातोय असे कुठेच जाणवत नाही. रफी यांनी अनेक पार्श्वगायिकांसोबत गाणी गायली. विशेषत: लता मंगेशकर व आशा भोसले यांच्यासोबतची त्यांची गाणी तुफान गाजली. यामध्ये 'अच्छा जी मै हारी...या गाण्याची मजा काही औरच आहे.  मधुबाला व देव आनंद यांच्यावर चित्रित झालेलं हे गीत पडद्यावर जितके पहायला छान वाटते  तितकेच ते रफी आणि आशाताईंच्या स्वरातील लाडिक व खोडकरपणामुळं ऐकायलाही छान वाटते. हीच रफींची महानता होती. त्यांना विनम्र अभिवादन.  

प्रा. विजय कोष्टी,

कवठेमहांकाळ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !