युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता हातात हात घालून हदयास हदय जोडून बंधू सहाय्याला लाहो बलसागर भारत होवो - साने गुरुजी
युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता
हातात हात घालून
हदयास हदय जोडून
बंधू सहाय्याला लाहो
बलसागर भारत होवो
- साने गुरुजी
आज आपण २१ व्या शतकात पदार्पण करत आहोत. आपला भारत देश विश्वगुरू होण्याच्या शर्यतीत एकेक पाऊल पुढे टाकत आहे. या २१ व्या शतकात " युवा वर्गातील वाढती व्यसनाधीनता " यासारखा निबंध लिखानाचा विषय ठरावा. यासारखे दुर्देव कुठेच नसेल.
जगातील सर्वात जास्त युवक असलेला देश म्हणून भारताची ओळख आहे. कारण १८ ते ३५ या वयोगटातील ५५ टक्के युवक भारतात आहे. हा युवकवर्ग निरोगी, विवेकी, सुदृढ, विज्ञाननिष्ठ, व्यसनमुक्त असणे हीच देशाची खरी ताकद आणि यश आहे. परंतू भारतात विचित्र स्थिती पहावयास मिळते. किशोरवयींन लहान मुलांपासून ते युवकापर्यंतचे सर्वच घुटखा, मावा, तंबाखू, सिगारेट, बिडी, चरच, गांजा, ड्रग्स अशा विविध पदार्थांचे सेवन करून रस्त्यावर थुंकतांना दिसतात. अशी व्यसनाच्या जाळ्यात अडकलेली युवा पिढी देशाचे भवितव्य कसे ठरू शकेल हाच गंभीर प्रश्न आज भारतासमोर निर्माण झाला आहे.
शाळा, महाविद्यालयाच्या १०० मीटरच्या परिसरात मद्य विक्री, दारू, सिगारेट, बिडी, तंबाखू, घुटखा विकण्यास शासनाने बंदी घातली आहे. तसा प्रतिबंध कायदा देखील २००३ साली शासनाने लागू केला आहे. परंतू शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बिडी, तंबाखू, घुटखा, सिगारेट विकला जातो की नाही याची शहानिशा करणारी यंत्रणा दिसत नाही. याचा परिणाम शिक्षण घेणाऱ्या युवा पिढीवर मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे. अनेक शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात घुटख्याच्या पाकिटाचा मोठ्या प्रमाणात कचरा झालेला दिसून येतो. याशिवाय बेकायदा दारू आणि घुटखा विक्री थांबविण्यास शासनाचे नाकार्तेपण दिसून येते. अवैध दारू विरोधी समित्या तालुकानिहाय स्थापण्याचे परिपत्रक गृहखात्याने २००४ मध्ये काढले होते. पण कार्यवाही करताना अद्याप अशा समित्या आढळत नाहीत किंवा स्थापन झाल्या असे दिसून येत नाही.
सिगारेट, बिडी, चिलीम ओढणे म्हणजेच धुम्रपान करणे शरीराला घातक आहे. त्यामध्ये तंबाखू, निकोटीन यासह विविध शरीर घातक रसायने असतात. एकट्या सिगारेट मध्ये जवळजवळ ३२ वेगवेगळी अपायकारक रसायने असतात. सिगारेट बिडीचे प्रत्येक पाकीट हे सेवन करणाऱ्याला मृत्यूच्या जवळ घेऊन जात असते. एक सिगारेट मनुष्याच्या जीवनातील आठ मिनिटे कमी करते. सध्या जगातील १ अब्ज लोक हे धुम्रपानाच्या विळख्यात सापडलेले असून प्रतिवर्षी किमान सहा लाख लोक मृत्युमुखी पडतात. धुम्रपानाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या फुफ्फूसांवर होतो. धुम्रपान करणाऱ्यांना फुफ्फूसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. धुम्रपान हे फुफ्फूस कॅन्सरचे ९० टक्के कारण असते.
ताणतणावातून मुक्तता मिळवण्यासाठी, मन शांत करण्यासाठी, एकटेपणा घालविण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी, नकारात्मक गोष्टी विसरण्यासाठी, राग विसरण्यासाठी युवा वर्गातील मुले व्यसन करतात. मित्रांची संगत देखील एक कारण म्हणता येईल. मद्यपान व्यसनाचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. मद्यपानामुळे यकृताचे विविध विकार उत्पन्न होतात यामध्ये हिपाटायटिस, यकृत संक्रमित होणे. यकृताचा सिरोसिस, लिव्हर फेल्युअर, लिव्हर कॅन्सर यासारखे यकृताचे विविध आजार उत्पन्न होतात. शिवाय मद्यपान करणार्यांमध्ये हार्ट अॅटक, किडण्या निकामी होणे, फुफ्फूसांचा कर्करोग, पोटाचा कॅन्सर, तसेच विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो.
व्यसनाधीन झालेली तरूण पिढी व्यसनातून बाहेर काढण्यासाठी केवळ निबंध, कविता लिहून, धुम्रपानविरोधी शपथ घेऊन, जनजागृती करून चालणार नाही तर, मद्य विक्री करणारी दुकानेबंद करावी लागतील. तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेटला देखील आळा घालावा लागेल. तरुणांनी आधी स्वतःहा प्रामाणिक राहून व्यसनाचा त्याग करावा. तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने हा देश व्यसनमुक्त होईल.
जय हिंद! जय भारत
विजय सुर्यवंशी
जळगाव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा