नासिक येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळा जि. सोलापूर येथे शाखा...
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेची करमाळ्याला शाखा...
नाशिक..दि.२४::-आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या करमाळा येथे नविन केंद्राचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. संस्थेचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, सहकार्यवाह गंगाधर कुलकर्णी, कार्यकारीणी सदस्य सर्वश्री सचिन पाडेकर, सुभाष सबनीस, उल्हास पंचाक्षरी रोहीणी कुलकर्णी, सुप्रिया सबनीस आणि केंद्राचे पदाधिकारी संतोष कुलकर्णी, सदस्य सुधीर पुराणिक, नरहरी होशिंग, सारंग पुराणिक, सुनिल कुलकर्णी, सुनिल देशमुख, राजेंद्र सुर्यपुजारी, निलिमा पुंडे, सागर कुलकर्णी उपस्थित होते.
उद्घाटनाच्या निमित्ताने सामुदायिक व्रतबंधाचे आयोजन करण्यात आले होते. अठरा बटुंचा व्रतबंध यावेळी पार पडला. केंद्राच्या केंद्रप्रमुखपदी संतोष कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
आखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिकच्या ध्येय धोरणानुसार आणि संस्था पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा केंद्राच्या माध्यमातून समाजाची सेवा करू,
तसेच विविध उपक्रम राबवून संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करू असे आश्वासन केंद्रप्रमुख संतोष कुलकर्णी यांनी यावेळी दिले. शेखर जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा