महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला ! डाॅक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांची "लिजेंड आॅफ इंडिया" पुरस्कारासाठी निवड !


नाशिक::- येधील साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अॅण्ड रिसर्च सेंटर चे संस्थापक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांची भारतातील अग्रगण्य EOCONOMIC TIMES ने दखल घेत त्यांची मानाचा 
'LEGEND OF INDIA ' 
 (FOR CARDIOLOGY) २०२२ साठी निवड केली. इकाॅनामिक्स टाईम्स च्या पाचव्या डाॅक्टर्स डे बैठक २०२२ च्या कार्यक्रमात त्यांना विशेष निमंत्रित केले आहे.

       सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रम ३० जुन रोजी हाॅटेल हयात रिजन्सी, नवी दिल्ली (Hyatt Regency New Delhi) येथे देशभरातील निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
     " लिजण्ड आॅफ इंडिया" बहुमानाबद्दल डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
                 मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था, साप्ताहिक न्यूज मसाला, लोकराजा दिवाळी विशेषांक परिवारातर्फे डॉक्टरांचे अभिनंदन व पुढील वाटचिलीस हार्दिक शुभेच्छा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !