संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाची यात्रेदरम्यान रोज सजावट ! मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीतून सजावट करण्याचे अवघड कार्य !

माडसांगवी(करण बिडवे)::- श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी आणि चांदीचा रथ पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या यात्रे साठी मार्गस्थ झाला असून या रथयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले आहेत.
 गेली दोन वर्षे कोरोना महामारी मुळे पायी वारी बंद होती यंदा मात्र या वारीत नवचैतन्य निर्माण झाले आहे. पायी वारकऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे . कोरोनामुळे गेली दोन वर्षे रथ सजावटीची परंपरा बंद होती त्यामुळे सजावटकार मंडळी नाराज झाली होती. यंदा मात्र या मंडळीत चैतन्य संचारले आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चांदीच्या रथाला दररोज नवनवीन प्रकारची फुले, हार, तुरे, सजावटीच्या वस्तू वापरून आकर्षक सजावट केली जाते.

 माडसांगवी येथील ह.भ.प. स्वर्गीय शिवाजी महाराज पेखळे यांच्या संकल्पनेतून ही रथ सजावट परंपरा आजही उत्साहात सुरू आहे. यात्रा मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी निरनिराळ्या मित्रमंडळी कडून दररोज रात्री रथाच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून हि मंडळी सुंदर सजावट करतात. साधारण एक महिना रथ वारी पंढरपूर पर्यंत चालत जाते. दररोज निराळ्या पद्धतीने नैसर्गिक फुलांच्या माध्यमातून सुगंधी फुलांची रथाला सजावट डोळ्याचे पारणे फेडणारी असते. स्वर्गीय शिवाजी महाराज पेखळे यांच्या निधनानंतर वारीची परंपरा त्यांचे चिरंजीव दशरथ पेखळे सांभाळत असून रथ सजावटीसाठी सुभाष काठे, राजू महाले, डॉ.ज्ञानेश्वर पेखळे, पत्रकार अरुण बिडवे,

रमेश वाघ, पांडुरंग बनकर, वासू सोनवणे, सतीश मंडलिक, संजय विधाते, कैलास माळी, वरवंडी ग्रामस्थ मंडळ, नाशिक फुल बाजार मित्र मंडळ, वैभव पतसंस्था पळसे, संतोष ढमाले, योगेश बोराडे, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पतसंस्था चिखली, कैलास घुमरे, हरिभाऊ गटकळ, पांडुरंग गडकरी, हरी भक्त परिवार, जय बाबाजी परिवार, भास्करराव जगताप सामनगाव, शिवशंभु प्रतिष्ठान आडगाव, भाऊसाहेब टिळे, चंद्रकांत टिळे, निवृत्ती जाधव, वारकरी मंडळ शेवगेदारणा, राजेंद्र घुमरे, संतोष घुमरे, जयश्री खर्जुल नगरसेविका नाशिक रोड, कर्जत ग्रामस्थ, शंकर शेळके कोरेगाव, जय बाबाजी मित्र मंडळ मांडसांगवी, समस्त ग्रामस्थ उंबरखेड, शिवनेरी मित्र मंडळ कंदर, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ भजनी मंडळ त्र्यंबकेश्वर, पप्पू निकम, नामदेव लबडे, राजाराम थेटे, संदीप लबडे गिरणारे, श्रीकृष्ण मित्र मंडळ बाभळेश्वर, पिंपळणारे येथील ग्रामस्थांची वाखरी सोहळा सजावट आणि संजय तांबे आडगाव यांची पंढरपूर नगरप्रदक्षिणा सोहळा सजावट असते. आदींसह असंख्य सांप्रदायिक मंडळी सहभागी होउन रथ सजावटीच्या माध्यमातून सोहळ्याचा आनंद घेतात.
***********************************
दोन दशकांपेक्षा अधिक जुनी रथ सजावटीची अखंडित परंपरा !
            # श्री क्षेत्र त्रंबकेश्वर ते पंढरपूर वारी मार्गात मुक्कामाच्या ठिकाणी निरनिराळ्या मंडळींकडून दररोज रथाची फुलांनी सजावट !
            # माडसांगवी चे स्वर्गीय ह. भ .प .शिवाजी महाराज पेखळे यांच्या संकल्पनेतून नैसर्गिक फुलांची सजावट !
           # दररोज नवीन थीम घेऊन रात्रीतून पहाटेपर्यंत चांदीच्या रथाला सुगंधी फुलांचे कोंदन ! 
            # संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा सजावटीसाठी रथ सजावटकार मंडळींमध्ये संचारले चैतन्य धोरणामुळे दोन वर्ष खंडित परंपरा पुन्हा सुरु !
***********************************
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मित्रांसोबत संतश्रेष्ठ निव्रुतीनाथ महाराज यांच्या रथ सजावट वारीत सहभागी होउन रथ सजावट करतो. त्यामुळे दरवर्षी आम्हाला नाथ वारीचा आनंद मिळतो. वारकरी संप्रदायाच्या या वारी ला दोन वर्षे कोरोना मुळे खंड पडला, मात्र आजही पुर्वी पेक्षाही जास्त प्रमाणात वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. जो या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होईल त्यालाच या भक्ती मार्गाची अनुभूती येईल.
        - सुभाष काठे आणि मित्र परिवार
रथ सजावट ग्रुप माडसांगवी नाशिक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !