२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !

२५ जून भारतीय इतिहासातील सुवर्ण दिनच !

       २५ जून १९८३ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली हा संघ विश्वचषकात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेला तेव्हा या संघाकडून कोणालाच अपेक्षा नव्हतीपण युवा भारतीय संघाने आपल्या समर्पणाने आणि मेहनतीने जगातील सर्व संघांना गुडघे टेकायला लावून २५ जून १९८३ ला क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्डस वर दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा अंतिम फेरीत पराभव करून विश्वचषक जिंकला.


त्या विजयानंतर क्रिकेट हा खेळ भारतात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. या स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात भारताच्या १७ धावांत पाच विकेट पडल्यानंतर तरूण कर्णधार कपिल देवची नाबाद १७५ धावांची खेळी क्रिकेटच्या इतिहासात एक दंतकथा बनली आहे.
 विश्वचषक विजय हा सामूहिक विजय होता. त्या विजयात प्रत्येक खेळाडूने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कामगिरी केली. हा ऐतिहासिक विजय सर्व खेळाडूंसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्या विजयानंतर भारतीय संघाकडे आदराने पाहिले जात होते. क्रिकेटप्रेमी तो दिवस कधीच विसरणार नाहीत. तो ऐतिहासिक दिवस क्रिकेट दिन म्हणून लक्षात ठेवायला हवा !                     प्राविजय कोष्टीकवठे महांकाळ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !