डॉ. विजय दहिफळे साम टीव्ही ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित !

डॉ. विजय दहिफळे साम टीव्ही ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित !

नाशिक । आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सेक्सॉलॉजिस्ट, एन्ड्रॉलॉजिस्ट आणि युरॉलॉजिस्ट डॉ. विजय दहिफळे यांना साम टीव्ही ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. दुबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या सोहळ्यात डॉ. दहिफळे यांचा गौरव करण्यात आला. 

            याप्रसंगी अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी डॉ. दहिफळे यांना पुरस्कार प्रदान केला. साम टीव्हीचे बिझनेस हेड अमित सिंग तसेच साम टीव्हीचे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. डॉ. विजय दहिफळे यांनी आजवर लैंगिक समस्यांचा सामना करणार्‍या लाखो जोडप्यांवर अत्याधुनिक उपचार करून त्यांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले आहे.

साम टीव्हीवर सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम गेल्या पाच वर्षांपासून अविरत सुरू आहे. या मालिकेतून समुपदेशन करून सुखी जीवनाचा मंत्र, लैंगिक शिक्षण, जागृती, आणि सुरक्षा यांवर ते देश-विदेशात मार्गदर्शन करतात. याविषयी मराठी, हिंनदी आणि इंग्रजी भाषांतील त्यांची पुस्तकेदेखील जगभरात वाचली जातात. 
           आज समाजात धकाधकीचे जीवन जगताना जे नैराश्य येते, आत्महत्येचे विचार येतात, कौटुंबिक सुख न मिळाल्याने घटस्फोट उद्भवतात याशिवाय आरोग्याचा विचार करता लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकारासारखे आजार उद्भवतात, अशा रूग्णांना योग्य ते मार्गदर्शन करून तसेच त्यांचे प्रश्‍न निकाली काढण्याचे कार्य सातत्यपूर्ण करत असतो. यामुळे अनेकांचे जीवन सुरळित झाल्याचा दावा डॉ. दहिफळे करतात. अशा प्रकारे समाजाभिमुख कार्य करणार्‍या डॉ. दहिफळे यांच्या कार्याचे चीज व्हावे, म्हणूनच साम टीव्हीने त्यांना ग्लोबल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्डने सन्मानित केले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान, डॉ. दहिफळे यांनी पुरस्कार स्विकारला तेव्हा समवेत अ‍ॅस्थेटिक, लेसर आणि प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे, कु. वैष्णवी दहिफळे, अथर्व दहिफळे हेदेखील उपस्थित होते. 
दर सोमवारी नाशकात उपलब्ध
       दरम्यान, डॉ. दहिफळे हे दर सोमवारी नाशिकमध्ये सल्ला आणि उपचारासाठी उपलब्ध असतात. संपर्क आणि उपाचारासाठी 9822326248 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना आकार देणारा शेल्टर-२०२४ चा भूमीपूजन सोहळा संपन्न ! २० ते २५ डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर २०२४, घरे आणि बांधकाम बाबत सर्व काही एकाच छताखाली !