जग हे पेशंट केअर आहे, स्पर्धेत टिकायचे असेल तर ग्राहक स्नेही व्हावे - जगन्नाथ शिंदे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कॉपोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत
टिकण्यासाठी औषध विक्रेत्यांनी ग्राहकस्नेही व्हावे- जगन्नाथ शिंदे
फार्मासिस्ट संघटीत न झाल्यास व्यवसाय संपुष्टात !
नाशिक : देशभरातील सर्वात मोठा औषध विक्रीचा व्यवसाय काबीज करण्यासाठी मोठ्या भांडवलदारांच्या कॉपोरेट कंपन्या मोठ्या ताकदीने उतरल्या आहेत. या कॉपोरेट कंपन्यांच्या स्पर्धत टिकण्याासाठी लहान होलसेलर व रिटेलर फार्मासिस्टने एकत्रित येवून व्यवसाय केला पाहिजे. त्याचबराबेर पारंपारीक केमीस्टचे दुकान न ठेवता अद्यावत शॉपी करून ग्राहकांशी स्नेह वाढवून कौटूंबिक नाते निर्माण केले तरच फार्मसिस्ट टिकेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमीस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सील परिषदेच्या निवडणूकीच्या निमीत्ताने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये नाशिक विभागातून उमेदवारी करीत असलेले नाशिक केमीस्ट असो.चे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मविप्रच्या रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महाराष्ट्रातील औषधी व्यवसाय व त्यासमोरील आव्हाने या विषयावर बेालताना शिंदे म्हणाले की, जग हे पेशंट केअर आहे. या व्यवसायात टिकण्यासाठी ग्राहकांशी संवाद वाढविला पाहिजे. त्यांची कौटूबंीक नाते निर्माण करून त्यांची काळजी घेतली पाहिजे. कॉपोरेट कंपन्यांच्या स्पर्धेत टिकताना शॉपी अद्यावत व इंटरनेट, सोशल मिडीयाशी जोडली गेली पाहिजे. अन्यथा स्पर्धेतच्या काळात बाहेर फेकले जावू. ‘बजेट तुमचे औषध आमचे’ हे ब्रीद घेवून केमीस्ट बांधवांनी व्यवसायात मार्गक्रमण केलेप पाहिजे. फार्मासिस्ट बांधवांनी संघटीत होण्याची गरज आहे. संघटीत राहीलो नाही तर मोठा मासा खावून टाकेल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी एमसीडीएच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहनही आप्पा शिंदे यांनी केले. याप्रसंगी मानद सचिव अनिल नावंदर यांनीही मनोगतात, फार्मसी व्यावसायकांसमोरील आव्हाने समजून सांगताना ऑनलाईनच्या काळात औषधे विक्रेत्यांनी ग्राहकांचे हित जोपसाण्याबरोबरच रिटेर्ल्सने एकत्रित येवून एकमेकाला सांभाळून घेतले पाहिजे. मेळाव्यास, सुरेश पाटील,अजीत पारख, नरेश भगत, योगेश बागरेचा, रविंद्र पवार, शशांक रासकर, सुनील भंगाळे, चेतन कर्डिले, राजेंद्र डागा, राजेंद्र धामणे, किरण छाजेड आदीनी मनोगत व्यकत केले.
जॉब पोर्टल अद्यावत करणार
एमसीडीएच्या निवडणूकीतील उमेदवार व नाशिक केमीस्ट असो.चे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी प्रास्ताविकात उमेदवारी करण्यामागे केवळ फार्मसीस्ट संघटीत करण्याचा उद्देश आहे. एमसीडीएमध्ये अध्यक्ष शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाल्यास पहिल्यांदा जॉब पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील औषध कंपन्यांकडे उपलब्ध जागंची माहिती दिली जाणार आहे. फार्मासिस्टला नोकरी मिळवून देण्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून चौवीस तास सेवा उपलब्ध करूनदेण्यात येईल. राज्यभरातील छोट्या छोट्या केमीस्टला एकत्रित करून साखळी पद्धतीने दुकाने सुरू करण्यात येतील. मुंबईच्या केमीस्ट भवन मध्ये नियमीत रिफ्रेशर कोर्सस, नवीन संधीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
महिला फार्मसीस्टचा सत्कार !
यावेळी कोरोना काळात अविरत सेवा देणार्या स्नेहल झळके, योगिता वाजे, वैशाली चतुर, कांचन पाटील, तनुजा सोननीस, दिपाली म्हस्के, सोनाली वारुंगसे, ज्योती हांडोरे, संगीता शहा, सोनाली दिवटे, हर्षाली पोरजे यांच्यासह १०० हून अधिक महिलांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने केमीस्ट बांधव उपस्थित हातेे. विशेष म्हणजे १५०हून अधिम महिला फार्मीसस्ट प्रथमत:च मेळाव्यास उपस्थित राहिल्याने अध्यक्ष शिंदे यांनी कौतुक केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Selected best information
उत्तर द्याहटवाNews masala,by Rajendra patil.we read it regularly.
उत्तर द्याहटवा