स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी व व्हीजे-एनटी यांचे आरक्षण ! समर्पित घटित आयोग राज्याच्या दौऱ्यावर ! नासिकला २२ में रोजी,,,,

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी व व्हीजे-एनटी यांचे आरक्षण !

समर्पित घटित आयोग २२ मे रोजी नाशिक विभागीय दौऱ्यावर !

नागरिकांना व सामाजिक संघटनांना मते व निवेदने सादर करण्यासाठी अगोदरच करावी लागणार नाव नोंदणी !

      नाशिक, दि.१३ मे, (जिमाका वृत्तसेवा):
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील ओबीसी, व्हिजे-एनटी यांना आरक्षणासाठी घटित केलेल्या समर्पित आयोगाचा राज्यभर विभागस्तरावर भेटींचा कार्यक्रम जाहिर झाला असून, २२ मे, २०२२ रोजी आयोग नाशिक विभागीय दौऱ्यावर असून, या दौऱ्यात नागरिकांची व या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांची निवेदने स्विकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आगेादर नाव नोंदणी करावी लागणार आहे. 

          यासंदर्भात आयोगामार्फत जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, शहरी क्षेत्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास म्हणजे ओबीसी, व्हिजे-एनटी  यांना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. या आयोगाने राज्यातील  या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना व नागरिकांची मते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून २१ मे ते २८ मे या कालावधीत राज्यातील विविध विभागात भेटीचा कार्यक्रम घोषित केला आहे. घोषित दौऱ्यानुसार आयोग रविवार, २२ मे, २०२२ रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी ०५:३० ते ०७:३० या वेळेत भेट देणार आहे. 

अगोदरच करावी लागणार नाव नोंदणी !

या क्षेत्रात काम करणाऱ्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या नाशिक, अहमदनगर, धुळे,
जळगांव, नंदूरबार या जिल्ह्यातील ज्या सामाजिक संघटना व नागरिकांना आपली मते व निवेदने आयोगासमोर सादर करावयाची आहेत त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड, नाशिक येथे आयोगाच्या भेटीअगोदर नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. 

असा असेल राज्यभर भेटींचा कार्यक्रम:

◼️नाशिक विभाग : रविवार 22 मे 2022 सायंकाळी 5.30 ते 7.30 विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक.
◼️पुणे विभाग : शनिवार,  21 मे, 2022 सकाळी 9.30 ते 11.30 विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे.
◼️औरंगाबाद विभाग: रविवार, 22 मे, 2022 सकाळी 9.30 ते 11.30 विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद.
◼️कोकण विभाग : बुधवार, 25 मे, 2022 दुपारी 2.30 ते 4.30 विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन.
◼️अमरावती विभाग :  शनिवार, 28 मे, 2022 सकाळी 9.30 ते 11.30 विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती.
◼️नागपूर विभाग :  शनिवार 28 मे, 2022 सायंकाळी 4.30 ते 6.30 विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे