आशापुरी मातेचा आंनदोस्तव सोहळा व माहेरवाशिणीचे स्नेहमिलन उत्साहत संपन्न !!

खामखेडा येथे आशापुरी मातेचा आंनदोस्तव सोहळा व माहेरवाशिणीचे स्नेहमिलन उत्साहत संपन्न !!

        देवळा, महेश शिरोरे (प्रतिनिधी )--  देवळा तालुक्यातील खामखेडा येथे अक्षय तृतीयेच्या  साडेतीन मुहूर्तावर (८ मे रोजी) खामखेडा नगरीत आई आशापुरी आंनदोस्तव सोहळा, माहेरवाशिणी स्नेहमिलन आणि शिरोरे परिवाराचे स्नेहसंमेलन हा त्रिवेणी, त्रिसूत्री कार्यक्रम  दिमाखदार सोहळ्यात आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

     ब्रम्ह वृंदाच्या साक्षीने सकाळी पहाटे पाच वाजेपासून ते साडे अकरा वाजेपर्यंत होम हवन विधी करण्यात आला तर परिवारातील आलेल्या सर्व माहेरवाशिणी व जावाई, भाचे, शिरोरे परिवारातील सर्व सदस्य, खामखेडा वासीय यांच्या उपस्थितीत आई आशापुरी मातेची रथातून मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावात रांगोळी काढून गांव सुशोभित करण्यात आले होते. सर्व माहेरवाशिणी व उपस्थितांनी देवीच्या गाण्यांच्या तालावर तल्लीन होऊन नाचण्याचा आनंद लुटला. मिरवणुकीत जांभळ्या रंगाची साडी व फेटा परिधान केलेल्या माहेरवाशिणी सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या, पुरुषांना सफेद ड्रेस कोड , तर भाचींना लाल साडी, सासरवाशिनींना केशरी रंगाची साडी असल्याने मिरवणुकीतील वेगळेपण दिसत असल्याने नयनरम्य वाटत होते.  खामखेडा नगरीतून ही मिरवणूक वाजत गाजत मंडपात आल्यानंतर प्रतिमा पूजन करून आई भगवतीची प्रतिमा यजमानांच्या हस्ते सनई चौघडा व वाद्यांच्या सुमधुर संगीतात साजरा होत असलेल्या दिमाखदार सोहळ्यात आसनावर आई आशापुरी मातेला स्थानापन्न करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मातेची विधिवत पूजा करून प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्वागत गीत सार्थक शिरोरे, अर्थव शिरोरे, शुभ्रा कोठावदे या चिमुकल्यांनी आपल्या वाणीतून सादर केले. ५६ भोग महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, या सोहळ्याचे वैशिष्ट्ये ९५ वर्षाच्या  माहेरवाशिणी हसत खेळत आनंदात खामखेडा नगरीत आपल्या जन्म भूमीत आनंदी दिसत होत्या. शिंदखेडा पाटण या आईच्या स्थानावरून पोस्टमन रुपी बैलगाडीवरती आई आशापुरीने पाठविलेले शिरोरे परिवाराला देण्यासाठी गोदामाईचे पत्र घेऊन आलेले दत्तात्रेय कोठावदे यांनी सर्व उपस्थितांच्या साक्षीने पत्राचे वाचन केले. सदर पत्र सोहळ्याचे आयोजक तथा पत्रकार महेश शिरोरे यांच्या कडे ओवी दत्ता कोठावदे यांच्या हस्ते देण्यात आले. माहेरवाशिणी व जावई, भाचे, प्रमुख पाहुणे यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. माहेरवाशिणींनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजचा सोहळा "न भूतो न भविष्यती" असा नयनरम्य ठरला असून आमच्या सदैव स्मरणात राहील. या मंगलमय वातावरणात आम्ही आखाजी च्या मुहूर्तावर झोका खेळून आनंद लुटला तो अविस्मरणीय राहील. हा कार्यक्रम पंचक्रोशीतील आगळा वेगळा झाला,

प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात माहेरवाशिणी सोहळे होत असतात मात्र पण हा सोहळा एक विशेष आगळावेगळा ठरला, शिरोरे परिवाराने कोणत्याही माहेरवाशिणी कडून वर्गणी गोळा केली नाही व काही त्यांना काम देखील सांगीतले नाही, जेणे करून सर्व माहेरवाशिणी आनंददायी वातावरणात येतील असे योगिता शिरोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. विलास शिरोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या मुली, भाची, आत्या, या सर्व खामखेडा नगरीतील माहेरवाशिणी असून, खामखेडा येथील शिरोरे परिवार हा व्यवसाय, नोकरीनिमित्ताने आपापल्या सोयीनुसार राहायला परगावी गेलेत. गावात फक्त सात कुटुंब राहायला असल्याने त्यांच्या मनात आले की आपण आपल्या परिवारातील सर्व लेकींना खामखेडा नगरीत बोलावून त्यांचे स्वागत, सत्कार करण्याचा विचार केला व आजच्या सोहळ्यातून साध्य केला. या सोहळ्याचे आयोजक महेश शिरोरे, रामचंद्र शिरोरे, योगिता शिरोरे, रमेश शिरोरे, पोपटराव शिरोरे, भगवान शिरोरे, निखिल शिरोरे, अमोल शिरोरे, प्रकाश शिरोरे, निलेश शिरोरे, अतुल शिरोरे, स्वप्नील शिरोरे, तुषार शिरोरे, नंदकिशोर शिरोरे, मीना शिरोरे यांच्या मनातील संकल्पना शिरोरे परिवाराने अंमलात आणली. येथील प्रकाश शिरोरे यांच्या जागेवरती कार्यक्रमाचे आयोजन करीत माहेरवाशिणी, भाच्या, भाचे, जावाई, नातवंडे, प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करून त्रिसूत्री संकल्पनेतून मंगलमय वातावरणात आनंददायी ठरला. खान्देश किंग शिरपूर  येथुन आलेल्या खान्देश किंग ग्रुप तर्फे, आबा चौधरी , धीरज चौधरी या कलाकारांनी सर्वांची मने जिकून त्यांच्या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. आलेल्या सर्वाना शिरोरे परिवाराकडून भेट वस्तू देण्यात आली, माहेरवाशिणींसाठी साठी रीतिरिवाजाप्रमाणे ओटी, व खाऊ देण्यात आला. खामखेडा वाशियांचे भाचे बाबूलाल अमृतकार व सौ. रेखावती अमृतकार यांच्या कडून आलेल्यांना सर्वांना पर्स भेट देण्यात आली. सौ. शोभाताई भास्कर दशपुते यांच्या कडून गळ्यातील ठुशी भेट देण्यात आली. याप्रसंगी आलेल्या ६ महिला व ५ पुरुष यांची "भाग्यवान" सोडत काढण्यात आली. त्यात महिला गटामध्ये ज्योती शिवाजी शिरोरे 
 या भाग्यवान माहेरवाशिणीस पैठणी भेट तर  अर्चना राजेंद्र पाटकर, दिपाली तुषार ब्राम्हणकार, सुगंधा श्रावण शिरोरे, शोभाताई भास्कर दशपूते, हर्षदा नितीन पाचपुते, पुरुषांमधून डॉ. धनंजय भास्कर दशपुते या भाग्यवान विजेत्यांना सोहळे  देण्यात आले. किरण भटू देशमुख, राजेंद्र एकनाथ पाटकर, डॉ. के के कोठावदे, पंकज सुधाकर भोकरे, या भाग्यवान जावई व भाचे "भाग्यवान" ठरले. जोगवा मागून शिरोरे परिवारातील सर्व सात कुटुंबाचे एकत्रीकरण करून आंनद दायी वातावरणात सर्वांचे मिलन केले. या मिलन प्रसंगी सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू अनावर झालेत. सर्व माहेरवाशिणी मनमोकळे पणाने आनंदात सर्व कुटुंबाला बघितले. शिरोरे परिवाराने आलेल्या सर्व माहेरवाशिणी ना सुखांत आपापल्या सासरी जाण्यासाठी एकत्र झालेल्या माहेरवाशिणींना निरोप देत शुभेच्छा दिल्या. सोहळ्याचे सुत्रसंचलन सचिन दशपुते यांनी, प्रास्ताविक महेश शिरोरे व आभार पोपटराव शिरोरे यांनी मानले. यावेळी आलेले प्रमुख पाहुणे सुभाष डी. येवला, उदय दादा वाणी नाशिक, अरविंद कोठावदे, सचिन दशपुते, दिगबर घरटे, पंडित निकम, आण्णा पाटील आदींसह खामखेडा ग्रामस्थ उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे