भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

नाशिक : नाशिक मर्चंट बँकेचे माजी संचालक, लाडशाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष भास्कर कृष्णा कोठावदे (वय ७४) यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. कोठवदे यांनी नाशिकच्या सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राचे  भरून न निघणारे नुकसान झाले असून लाडशाखीय वाणी समाजाचे एक जेष्ठ छत्र हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.



        नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा सुवर्णा नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. मंगळवारी (दि.२४ मे) रात्री १० वाजता अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
**********************
    नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व संस्थेच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेचे शालेय समिती अध्यक्ष भास्कर (आबा) कोठावदे यांचे आज दिनांक २४ मे २०२२ रोजी सायंकाळी ५:२५ वा. वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले आहे.
   सहकार क्षेत्रात त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे होते.
नाशिक शहरातील सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.
  नाशिक जिल्ह्यातील अनेक सहकारी पतसंस्थांचे मार्गदर्शक म्हणून भूमिका त्यांनी निभावली होती.
         भास्कर (आबा) कोठावदे यांच्या निधनाने नाशिक एज्युकेशन सोसायटीने एक अभ्यासू सदस्य गमावला आहे. त्यांच्या निधनाने कोठावदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ, कार्यकारी मंडळ, शिक्षक मंडळ, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी आहोत.
  ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो ! 
        राजेंद्र निकम 
           कार्यवाह 
  नाशिक एज्युकेशन सोसायटी, नाशिक.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे