मदतीसाठी आवाहन करण्याआधी मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था नासिक यांच्यावतीने मदत करण्यात आली- अध्यक्ष नरेंद्र पाटील
मदतीचे आवाहन,
माध्यम क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करीत असलेले नासिकचे रामदास नागवंशी यांच्या पत्नीचे अकस्मात निधनाने त्यांच्यावर आलेल्या संकटातून सावरण्यासाठी ऐच्छिक मदत करावी असे वाटते. मदतीसाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक, बॅक खाते क्रमांक, गुगल पे क्यूआर कोड खाली दिलेला आहे. दानशूरांनी आपल्या इच्छेनुसार मदत केल्यास त्यांना हातभार लागेल.
काल दि. ७ में रोजी "मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्था", नासिकच्या वतीने माध्यमकर्मी रामदास नागवंशी यांना आर्थिक मदत देण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी रामदास नागवंशी यांच्या पत्नीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नागवंशी अनेक वर्षांपासून नासिकच्या माध्यम क्षेत्रांत काम करीत आहेत. मात्र आजही त्यांच्याकडे स्वमालकीचे घर नाही की पैसा नाही. पत्नीच्या व स्वतः च्या तुटपुंज्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे तुटपुंज्या मानधनावर शक्य नव्हते, त्याचा परिणाम कर्ज रक्कम वाढण्यास कारणीभूत ठरत गेली तरीही दोघांनी स्वाभिमानी जीवन जगत शक्य होईल तितके समोर आलेल्या परिस्थितीला सामोरे जात होते पण "आभाळालाच भोक पडले तर शिवणार किती !" अशी परिस्थिती निर्माण झाली जी कुणावरही येऊ नये.
अशा वेळी आपण सहृदयपणे त्यांना मदत करायला हवी असे वाटते.
अशा वेळी आपण सहृदयपणे त्यांना मदत करायला हवी असे वाटते.
आज मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या वतीने त्यांचे सांत्वन करुन आलेल्या आपत्कालीन संकटात त्यांना आर्थिक मदत (रू. ५०००/-) देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष सुभाष सबनीस, खजिनदार नरेंद्र सुर्यवंशी, सचिव प्रकाश उखाडे उपस्थित होते.
पत्नीच्या निधनाने रामदास नागवंशी हे पूर्णपणे खचले आहेत, अशावेळी त्यांना छोटीशी जरी आर्थिक मदत केली तर त्यांच्या पुढील आयुष्यात थोडासा हातभार लागेल. आपणही त्यांना मदत करावी यासाठी त्यांचा बॅंकखाते नंबर छायाचित्र व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक खाली दिलेला आहे.
९२२५९ २२५२०,
92259 22520
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा