विशेष लेख शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची मानणारे साहेबराव जगताप !

विशेष लेख

शासकीय सेवा बजावतांना सेवाभावी वृत्ती महत्वाची मानणारे साहेबराव जगताप !
जुन्या आठवणींना उजाळा देत एक पाऊल सेवानिवृत्तीच्या दिशेने...

     नाशिक : नेहमी सर्वांशी मनमिळावू, जीवाभावाचे नाते जोडणारे सर्व पत्रकारांचे परिचित व्यक्तीमत्व म्हणजे श्री.साहेबराव जगताप.

आज त्यांच्याविषयी विशेष लिखाण करण्याचे कारण म्हणजे आज दिनांक ३१ मे २०२२ रोजी जगताप २७ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून सेवानिृत्त होत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचानलाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा माहिती कार्यालय धुळे यांच्या अधिनस्त प्रकर्षित प्रसिद्धी पथक कार्यालय, नवापूर, जि.धुळे येथून शासकीय सेवेची सुरुवात करत आज त्यांचा अतिशय गोड पद्धतीने नाशिकच्या जिल्हा माहिती कार्यालय, येथून सिनेयंत्रचालक पदावरुन सेवानिवृत्त होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

साहेबरांवाच्या बाबत थोडक्यात सांगायचे तर, एवढंच आहे की एका छोट्याशा दुर्गम आदिवासी भागातून कळवण तालुक्यातील पाटविहीर या गावात त्यांचा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थितीत जरी नाजूक असली तरी ईश्वरीय कृपने लहानपण खेळीमेळीने व आनंदात गेले. शिक्षण बी.ए (बी.जे ) पुर्ण केल्यानंतर म्हणतात ना "शासकीय नोकरी मिळणे सोपे नाही त्याला कुंडलीत चांगला योग असावा लागतो". अन् दैवाची साथ मिळताच संधीचे सोने करुन साहेबराव २८ वर्षांच्या शासकीय सेवेतून आज सेवामुक्त होत आहे.
         आजच्या धकाधकीच्या काळात शासकीय नोकरी करणे तारेवरची कसरत मानली जात आहे. अनेकांना सेवा बजावतांना अडचणी येतात. परंतू साहेबरावांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की ''माझ्या २८ वर्षांच्या कालावधीत सेवा बजावतांना कोणाचा रोष, डाग अथवा कलंक लावून घेतला नाही, ही माझी सर्वात जमेची मोठी बाजू असून माझ्या सेवेतून मिळणाऱ्या पगाररुपी आर्थिक मोबदल्यात मी माझ्या मुलाबाळांचे पालण-पोषण केवळ चांगल्याच प्रकारे केले नाही तर त्यांना उच्च शिक्षित बनवले याचा मला अभिमान असल्याचेही ते आवर्जून सांगतात. मुलगा चि. धिरज साहेबराव जगताप हा मॅकेनिकल इंजिनिअर झालेला असून तो पुणे येथील यशदा संस्थेने नुकतीच त्याची अदिवासी उमेदवरांमधुन यु.पी.एस.सी. च्या प्रशिक्षणासाठी निवड केली आहे व तो पुढील शिक्षण घेत आहे. अधिकारी होऊनच तो बाहेर पडेल याची मला खात्री आहे. मुलगी सौ. योगिनी जगताप -चव्हाण हिचे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण घेऊन विवाहबद्ध झालेली आहे. तर तिची सुध्दा यशदा संस्थेने पुणे येथे एस.बी.आय बँक मध्ये पी.ओ. प्रोबेशन ऑफिसर या पदाकरिता प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे.
       माहिती व जनसंपर्क विभाग हा शासनाच्या योजना व माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचा विभाग म्हणून मानला जातो तसेच हा विभाग शासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. त्या अनुषंगाने साहेबरावांचे कामाचे स्वरुप होते. सदरची सेवा बजावितांना त्यांना धुळे, नंदुरबार, जळगाव येथील जिल्हांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ह्याच ठिकाणी सिनेयंत्रचालक तथा पर्यवेक्षक या पदावर तळोदा येथे काम करण्याचे भाग्य प्राप्त झाले. तसेच नवापूर येथे प्रकर्षित प्रसिद्धी पथकामध्ये प्रभारी माहिती सहायक म्हणून काम करता आले. सन २०१६ ला जळगाव मधून नाशिक येथे जिल्हा माहिती कार्यालय येथे बदली झाल्यानंतर टी.व्ही कॅमेरामन, शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य वितरण विभाग नाशिक या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. शासनाच्या योजनांचा प्रचार, मेळावे, स्टॉल, कलापथक यासंबंधी देखील कामाची धूरा त्यांनी सांभाळली.
आज दिनांक 31 मे 2022 रोजी नाशिक येथील माननीय जिल्हा माहिती अधिकारी श्री. रणजितसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्ती घेत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. तसेच माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटनेचे (नाशिक विभाग) अध्यक्ष राजू अण्णा चौघुले व संघटनेचे सचिव, पदाधिकारी यांनीही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक येथील अधिकारी व कर्मचारी वर्गांकडूनही त्यांना उर्वरित आयुष्यासाठी  शुभेच्छा देण्यात आल्या. 
 त्यांचे सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य निरोगी, समाधानी व भावी पिढीला मार्गदर्शक ठरावे या  साप्ताहिक न्यूज मसाला व लोकराजा दिवाळी विशेषांक कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे